पुसद (Pusad Police) : आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन वसंतनगर परिसरातील व पुसद वाशिम मार्गावरील हेडा मॉल समोर (Pusad Police) पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशान्वये आगामी श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिलचे (Police mock drill) प्रदर्शन करण्यात आले.
विशेष म्हणजे आंदोलक म्हणून पोलीस प्रशासनाचे कर्मचारी तथा सर्व सामान्य नागरिक यांना सहभागी करून घेण्यात आले होते. प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी रजनीकांत दारव्हा यांचा मार्गदर्शनामध्ये मॉप ड्रिल (Police mock drill) घेण्यात आली. सदर मॉपड्रिल मध्ये पो स्टे पुसद शहर, पो स्टे वसंतनगर, पुसद ग्रामीणठाणे, खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सर्व पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी महिला पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान महिला जवान यांच्या व्यतिरिक्त गोपनीय विभागाचे पोलीस कर्मचारी इत्यादी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष करून काल रात्रीच येथे कार्यरत असलेले सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांची बदली झाल्यामुळे (Pusad Police) पुसद तालुक्याचा प्रभार दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे.