५ लाख २१ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुसद (Pusad Police raid) : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ( काळी दौ.) महागाव तालुक्यातील घोणसरा शेतशिवारात दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ग्रामीण पोलिसांनी गांजा शेतीवर धाड टाकून ५ लाख २१ हजार २६५ रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घोणसरा शेतशिवारात आरोपी शेतकरी बनसिंग किसन राठोड (वय ३३) रा. घोन्सरा ता. महागाव यांनी आपल्या शेतात गांजा पिकाची लागवड केल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली.
मिळालेले माहितीप्रमाणे (Pusad Police raid) पोलिसांनी सापळा रचुन रविवारी शेतात धाड टाकली असता शेतकरी बनसिंग किसन राठोड याचे शेतात गांजा पिकाची ५० झाडे त्यांचे एकूण वजन ३४ किलो ७५१ ग्राम किंमत ५ लाख २१ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीला अटक करण्यात आली. गुन्हा नोद करण्याची प्रक्रिया सुरू होती . सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांचे सूचनेप्रमाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनात एपीआय सुरेंद्र राऊत, पीएसआय कैलास ससाणे, एएसआय शेख मसूद, अशोक जाधव, पोलीस हवालदार रविंद्र गावंडे, केवटे, पोलीस नाईक सुनील माथणे, रणजित रबडे, पोलीस शिपाई महेश बाबर, योगेश आळणे यांनी केली.