पुसद (Pusad police) : तालुक्यातील उपनवाडी परिसरात अवैधपणे मातीचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर तहसीलदार महादेवराव जोरवर यांच्या मार्गदर्शनात निवासी नायब तहसीलदार गजानन कदम, मंडळ अधिकारी धुळधुळे व तलाठी निकम यांनी सदर कारवाई केली.
महसूल प्रशासनाने (Revenue Administration) दिलेल्या माहितीनुसार, उपनवाडी येथील पांडुरंग करण पवार यांचे ट्रॅक्टर, पवन रोहिदास राठोड याच्या ट्रॅक्टरला नंबर नाही, गणेश विठ्ठलराव पवार कारला यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच 29 3387, मधुकर प्रसराम राठोड उपनवाडी यांच्याही ट्रॅक्टरला नंबर नाही सदरील हे अवैधपणे मातीचे उत्खनन करून चोरट्या मार्गाने वाहतूक करीत होते. (Pusad police) पुसद मध्ये गेल्या काही दिवसांपासून महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेकत बांधकाम साहित्य अवैधपणे चोरट्या मार्गाने विकणाऱ्या व उत्खनन करणाऱ्या वाहतूक करणाऱ्या तस्करांमध्ये मोठी वाढ झाल्याची दिसत आहे. मात्र (Revenue Administration) महसूल प्रशासनाच्या मुळे तस्करांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे हे विशेष.