पोलीस जमादारासह त्याचे सहकार्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल
पुसद (Pusad Police) : आदिवासी शिक्षिका असलेल्या महिलेसोबतच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन व्हाट्सअप वर अश्लील व्हीडिओ पाठवून त्रास देणार्या (Pusad Police) पोलिसाला महिलेने चांगलेच फटकारले. महिलेला शरीर सुखाची मागणी करण्यासोबतच दोन लाखाची खंडणी मोबाईल फोन द्वारे मागितली होती. तसेच मागणी पूर्ण न केल्यास महिला शिक्षकेच्या पती व मुलाविरुद्ध बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल (Pusad crime) करण्याची व फोनवरच अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे पीडित आदिवासी महिलेने सुद्धा त्यास चांगलेच फटकारले.
महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मीनाक्षी सावळकर यांचा पुढाकार
फोनवर दिलेल्या धमकीनुसार पोलीस जमादार (Pusad Police) आपल्याला जीवाने ठार मारेल या भीतीने दि. 20 जून 2024 रोजी घडलेल्या घटनेची तक्रार वसंतनगर पोलीस स्टेशन देण्यास पोहचले. त्या दरम्यान आरोपी पोलिस जमादार निलेश पेंढारकर याने महिलेचे घर गाठले. परंतु महिला शिक्षिका न मिळाल्याने तिच्या शिक्षक पतीस आरोपी पोलिसाने इतर गुंडा चे मदतीने सार्वजनिक ठिकाणी रोडवर बेदम मारहाण केली. त्या घटनेची तक्रार देण्यास शिक्षक पती सुद्धा वसंतनगर पोलीस स्टेशन पोहोचले. शिक्षक महिलेसोबत पोलिसाचे असभ्य वर्तनुक, धमकी व शिक्षक महिलेचा शिक्षक पतीस बेदम मारहाणीच्या प्रकरण वसंतनगर पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न करुन आरोपी पोलीस व त्याचे साथीदाराविरुद्ध एन सी स्वरूपाचे साधे गून्हे दाखल करून आरोपी पोलिसास सहकार्य केले.
या घटनेबाबत पीडित शिक्षक पती-पत्नीने (Pusad Police) उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांचे कार्यालय गाठले. त्या ठिकाणी सर्व पुरावे सादर केल्यानंतर पंकज अतुलकर यांनी वसंतनगर पोलिसांना गुन्हे दाखल (Pusad crime) करण्यास सांगितले. तरीही एवढ्या गंभीर गुन्ह्याची वसंतनगर पोलिसांनी दखल घेतली नाही आणि केवळ पीडित शिक्षकेची तक्रार घेऊन फक्त ओसी देण्यात आली. त्यानंतर कारवाई होत नसल्याने अखेर मीनाक्षी सावळकर सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी पुढाकार घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्याशी 5 जुलै रोजी प्रत्यक्ष भेटून तक्रार दाखल केली.
त्यावेळी पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी तात्काळ (Pusad Police) महागाव पोलीस स्टेशन येथे पोलीस जमादार या पदावर कार्यरत निलेश पेंढारकर याचे विरुद्ध एनसी स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने त्याचे निलंबन करीत त्यास पोलीस मुख्यालयात जमा करण्याचे आदेश दिले. तसेच पोलीस स्टेशन वसंतनगरला सदर पोलीस जमादार निलेश पेंढारकर याचे सह त्यांचे साथीदारावर ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल (Pusad crime) करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार 5 जुलै च्या मध्यरात्री (Pusad Police) पोलीस जमादार निलेश पेंढारकर, सुरेश हराळ, सविता बळी, शिल्पा निलेश पेंढारकर, व तसेच सुरेश हराळ यांची पत्नी अशा पाच जनाविरुद्ध वसंतनगर पोलिसांनी भादवीची कलम 354 ड, 384, 323 294 141 143 506 व ॲट्रॉसिटी चे कलम 3 (1)(r), 3 (1)(s), 3 (1)(r)(va), 3 (1)(व)(i), 3 (1)(w)(ii) आदी कलमानुसार गुन्हे दाखल करून पुढील तपासात सुरुवात केली आहे.
या घटनेतील पाच आरोपी पैकी महिला आरोपी सविता बळी ही स्वतःच वसंत नगर पोलीस ठाण्यात येऊन या घटनेतील फिर्यादींचे विरोधात रिपोर्ट देण्यासाठी आली. मात्र घटनेतील आरोपी असल्यामुळे (Pusad Police) पोलिसांनी तिला तात्काळ अटक केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर करीत आहेत तर ठाणेदार वसंतनगर पोलीस स्टेशनचे शांतीकुमार पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक वेरूळकर करीत आहेत.