पुसद (Pusad rain) : शहरासह तालुक्यात दुपारी चार वाजता दरम्यान (Pusad rain) मेघगर्जनेसह धुवाधार अवकाळी पाऊस कोसळला. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उन्हाच्या प्रकोपामुळे मुक्या प्राण्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा जीव कासावीस झाला होता. (Department of Meteorology) हवामान खात्याने चार-पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती.
पुसदमध्ये धुवाधार अवकाळी पाऊस
आज मात्र मेघा गर्जनेसह अवकाळी पाऊस (Pusad rain) कोसळल्यामुळे, नागरिकांची काही अंशी गर्मी पासून सुटका झाली. एक तासापासून कोसळत असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अवकाळी पाऊस (rain water) तालुक्यात सर्वदूर कोसळत असल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे (lack of water) काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेल्या पिकांचे बागायती शेतीचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.