पुसद (Pusad rain) : शहरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालया जवळून जात असलेल्या व (Pusad City) पुढे जयनगर वालतुर रेल्वेकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडणाऱ्या डीपी रोडची पहिल्याच पावसात अशी अवस्था झाली. सदरील परिसरामध्ये खाजगी हॉस्पिटल्स (Pusad Hospital) आहे तर पुढे रहिवासी परिसर आहे. विद्यार्थी विद्यार्थिनींना तसेच रुग्णालयात येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. (Pusad rain) चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल अशी अवस्था सातत्याने होऊन बसत आहे.
गतवर्षी दैनिक देशोन्नतीने सदरील रस्त्या संदर्भात वृत्त प्रकाशित करून नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांचे लक्ष वेधले होते. दैनिक देशोन्नतीच्या प्रतिनिधीने स्वतः त्यांची भेट घेऊन सदरील व्यथा कथन केली होती. याची मुख्याधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली होती व त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात मुरूम टाकून दिला होता. मात्र नुकतंच या ठिकाणी (Pusad Bus station) एस टी महामंडळाच्या कंट्रोल रूम करिता लाईन चा केबल टाकने सुरू असून त्याची काम करणारी यंत्रणा ही महावितरणची आहे.
संबंधितांनी जेसीबीने रस्त्याच्या कडेला मोठी नाली खोदून त्यामध्ये केबल टाकून ते बुजवले. मात्र या खोदकामामुळे तयार झालेली इतर माती रस्त्यावर सोडून दिली. त्यामुळे पावसाच्या पाण्याने सर्वत्र चिखलमय रस्ता झाला आहे. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी दैनिक देशोन्नतीला सांगितले की, सदरील रस्त्याचा सिमेंट काँक्रीट चा प्रस्ताव मंत्रालयास्तरावर असून शेवटची सही झाल्यानंतर रस्त्याच्या कामाचे कंत्राट निघणार आहे. त्यामुळे (Police Station) लवकरच हा रस्ता सिमेंट काँक्रीट चा होणार आहे. हे विशेष.