पुसद (Pusad Rain) : शहरासह तालुक्यात आज दुपारी साडेचार वाजता च्या दरम्यान हलक्या (Pusad Rain) पावसाच्या सऱ्या वादळ वाऱ्यासह कोसळल्या. मात्र अजूनही तालुक्यासह शहरात दमदार मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा बळीराजाला लागलेली आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असून जून महिन्याची 15 तारीख उजाडली तरी अजून पर्यंत दमदार पाऊस पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता. तरी काही शेतकऱ्यांनी थोडा पाऊस कोसळल्यानंतर धूळपेरणी व कापूस लागवडीला प्राधान्य दिले होते हे विशेष. गतवर्षी तब्बल मान्सूनचा पाऊस तालुक्यासह शहरात एक महिना उशिरा कोसळला होता. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तब्बल एक महिना उशिरा सुरू झाला होता.
परिणामतः उशिरा पेरण्या झाल्यामुळे पिकांची उत्पादन क्षमता घटली होती. तर शेतकऱ्यांना अत्यल्प उत्पादनावर समाधान मानावे लागले होते त्यातही सातत्याने नैसर्गिक संकटे मानवनिर्मित संकटे शेतकऱ्यांच्या शेतीवर कोसळली. अतिवृष्टी अवकाळी तर सोयाबीन पिकांवर आलेला येलो व्हायरस यामुळे अनेक शेतकऱ्यांची सोयाबीनची पिके नष्ट झाली होती. यंदा मात्र जून महिन्यात मान्सूनचा पाऊस (Pusad Rain) थोडा थोडा का होईना कोसळत आहे. मात्र अजूनही शेतकरी बांधवांनी जमिनीची आठ इंच ओल होईपर्यंत पेरणी करू नये. असे शेतीतज्ञ सांगतात. विशेष करून गतवर्षीच्या नुकसानीचे पैसे शासनाकडून अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात वळते झालेले नाहीत.
अतिवृष्टी गारपीट (Pusad Rain) मदत शिल्लकच आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी केवायसी केली नसल्यामुळे शासनाने खात्यात पैसे टाकूनही ते त्याचा लाभ घेऊ शकले नाही. तालुक्यामध्ये किमान 45 हजार शेतकरी बांधव अजूनही शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत तर केवायसी नसल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे गेले नसल्याचे सांगितले जात आहेत. यावर्षीचे पीक कर्ज धोरण अत्यंत विचित्र पद्धतीने राबविल्या जात असल्यामुळे. शेतकरी बँकांच्या पीक कर्जासाठी चकरा मारत आहेत. तर यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँक या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात शेतकरी त्रस्त होऊन अर्ज करीत आहेत. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करण्यात येईल. असे मोघम उत्तरही संबंधितांकडून मिळत आहे. हे विशेष.