पुसद (Pusad Rural Police) : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मुंगशी येथील एका नवविवाहितेने सासरच्या व पतीच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरगाव बंगला येथील माहेर असलेल्या मृतक शिवानी विशेष पवार वय 20 वर्ष हिचा मुंगशी येथील तारासिंग पवार यांचा मुलगा विशेष पवार यांच्यासोबत विवाह झाला होता. झाल्यानंतर ती सासरी मुंगशी येथे नांदायला गेली.
मात्र सासरच्या लोकांनी व पतीने सातत्याने तिला मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले व मारहाण करत राहत होते. या रोजच्या त्रासाला कंटाळून अवघ्या वीस वर्षाच्या नव विवाहित तरुणीने विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपली. ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विशेष तारासिंग पवार पती, सासरा तारासिंग पवार, सासू नंदाबाई तारासिंग पवार,कु. ननंद सारिका तारासिंग पवार वय 27 वर्ष या सर्व लोकांनी त्या मुलीचा अतोनात छळ केल्यामुळे व तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे माहेरच्या लोकांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कलम85,/80,108,352,3(5) यासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून यातील आरोपींना जेरबंद करण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा बीट जमदार हे कार्यरत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या घटनेमध्ये पोलिसांची भूमिका मात्र उघडकीस आली आहे, प्रथम पोलिसांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास टाळटाळ केली. त्रस्त माहेरच्या नातेवाईकांना बराच वेळ थोपवून ठेवलं, त्यामुळे पोलीस सदर गंभीर प्रकरण दाबण्याच्या तयारीत होते असा आरोप मृतक विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे तर मुंगशी येथील बीट जमदार बंकेवार हे दैनिक देशोन्नतीशी बोलताना म्हणाले की, तुम्हाला माहिती देऊ नका असा दबाव माझ्यावर आलेला आहे. हे विशेष”.