पुसद (Pusad Shivsena) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तालुक्यामध्ये भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. दि. 10 ऑगस्ट रोजी शिवसेना जिल्हा समन्वयक रंगराव काळे यांच्या मार्गदर्शनात तथा शिवसेना जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते पुसद विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात शहराच्या प्रमुख रस्त्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आपले हार्दिक स्वागत या प्रकारचे बॅनर्स फलक तथा शिवसेना सभासद नोंदणी करून मोठ्या प्रमाणात भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये खासदार संजय देशमुख यांच्या सूचनेनुसार जिल्हा समन्वयक रंगराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख रवी पांडे शहर प्रमुख हरीश गुरुवाणी महिला शाखेच्या पोहरकर, मालती मिश्रा, ज्येष्ठ शिवसैनिक तथा उपजिल्हाप्रमुख राजेंद्र साकला, राजू वाकडे, विकास जामकर, विशाल जाधव, दिनेश गवळी, अवि बहादुरे, रवि बहादुरे, विजय बाबर यांच्यासह इत्यादी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.