पुसद (Pusad Signal system) : शहराची वाढती लोकसंख्या व ग्रामीण भागातून कामानिमित्त येणारा नागरिकांचा लोंढा शहरातील अंतर्गत वाहतूक हस्तव्यस्त ऑटो चालकांची गर्दी तर अवैध प्रवासी वाहन सिग्नल सुरू असतानाही सिग्नलच्या एरियामध्ये भरल्या जात असल्यामुळे हार्ट ऑफ सिटी म्हणून गणल्या गेलेल्या येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.
दिग्रस पुसद रोडवर अपघातामध्ये आतापर्यंत कितीतरी निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. (Pusad Signal system) छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुद्धा तीन-चार जणांना एक विद्यार्थिनीला ट्रक खाली चिरडून आपले प्राण गमवावे लागले होते. रस्त्यावरील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात हातगाडीवाले फळ गाडीवाले भाजी विक्रेते त्यांच्यासह इत्यादी साहित्य विकणारे फुटपाट ऐवजी रस्त्यावरच आपली दुकानदारी मांडत असल्यामुळे नागरिकांना वाहतुकीस रस्ता अपुरा पडत आहे. तर दूरसंचार विभागाकडून येणारी वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बस स्थानक कडे जाणारी वाहतूक हे एकत्र येत असल्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असते.
या (Pusad Signal system) रस्त्यावरील वाहतूक एकेरी असणे गरजेचे आहे. चा प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित पडून असूनही यावर अजूनही निर्णय घेतला गेलेला नाही हे दुर्दैव. तर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी याकरिता भारती मैंद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमातून पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी शहरात सिग्नल व्यवस्था सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल बसविण्यात आले.
मात्र त्यानंतर रस्त्याच्या विकास कामांसाठी ते सिग्नल काढून टाकण्यात आले होते. मात्र काही दिवसानंतर ते पुन्हा बसविण्यात आले. मात्र या (Pusad Signal system) सिग्नल व्यवस्थेचा वाहतुकीवर कुठलाही सकारात्मक परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे ही व्यवस्था कुचकामी ठरत आहे. तर पोलीस प्रशासनासह नगरपरिषद प्रशासन वाहतूक शाखा व सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रशासनाने अजूनही गांभीर्याने आपलं कर्तव्य निभावतांना दिसत नाही. दुर्दैव.