पुसद (Pusad suicide Case) : येथील बस स्थानकाच्या यात्रा शेडमध्ये एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर मागच्या बाजूच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन एका अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना. तीन नोव्हेंबरच्या सकाळी सात वाजता दरम्यान उघडीस आली.घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
आत्महत्या (Pusad suicide Case) करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली नाही. तो व्यक्ती कुठला आणि कोण आहे. त्याने आत्महत्या का केली, असा प्रश्न शहरात चर्चिला जात आहे. घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.