पुसद (Pusad Suicide Case) : वसंतनगर पोलीस स्टेशन (Pusad Police) अंतर्गत येत असलेल्या शहरातील शासकीय विश्रामगृहा समोरील शांती नगर येथे एका 20 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार शहरातील शासकीय विश्राम गृहाजवळील शांतीनगर येथे महात्मा मुंगसाजी विद्यालयाजवळ पोपळघाट यांच्या घरात एका 20 वर्षीय शिक्षण घेत असलेल्या तरुणांने स्वतःच्या रूम मध्ये सायंकाळी 5.30 ते 6 वाजताच्या दरम्यान (Suicide Case) गळफास लावून आत्महत्या केली.
मुरली गजानन पोपळघाट वय अंदाजे 20 वर्षे रा. रोहडा बेलोरा ता. पुसद असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सदर मृतक (Suicide Case) हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी कॉम द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. सदर तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी वसंत नगर पोलिसांना दिली. वसंतनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आले आहे. सदर घटनेचा अधिक तपास (Pusad Police) ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतनगर पोलीस व बीट जमदार करीत आहेत.