पुसद (Pusad Tehsil) : राज्य शासनाने ज्या नागरिकांची जन्म नोंद नगरपालिका ग्रामपंचायत मध्ये सापडत नसेल तर त्यांना तहसीलच्या सेतू सेवा केंद्रामार्फत अर्ज करून तहसीलदारांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयातून दाखला प्राप्त करून घेता येतो. मात्र पुसद तहसील (Pusad Tehsil) मधील या कार्यालयात अत्यंत सावळा गोंधळ सुरू असून हजार पाचशे रुपयाची चिरीमिरी दिल्याशिवाय संबंधित नागरिकांना संबंधित लिपिकाकडून दाखल्यांची पूर्तता केल्या जात नाही.
अशी तहसील परिसरात व संबंधित नागरिकांचा लिपिकाशी संपर्क आलेल्या नागरिकांनी (Pusad Tehsil) तहसील परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात जाऊन बघितले असता त्यामध्ये काही अंशी तथ्य दिसत आहे हे विशेष कर्तव्यदक्ष तहसीलदार महादेवराव जोरवर व एसडीओ आशिष बिजवल यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.