पुसद तहसीलमधील प्रकार, तक्रारीनंतर लिपिकाचे तीन महिने करिता निलंबन
पुसद (Pusad Tehsil) : तहसील कार्यालयातील मृत्यू नोंदीचे दाखले मिळणाऱ्या विभागात मृत्यूची नोंद घेऊन दाखल्यासाठी लिपिकाने पैशाची मागणी केली. तक्रारदार गजानन तोडक यांनी लिपिकाचे स्टिंग ऑपरेशन केले. त्याचा हा व्हिडीओ सामाजिक सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. महसूल विभागाने याची दखल घेत लिपिकावर तात्काळ कारवाई करीत त्याला तीन महिन्याकरिता निलंबित केले आहे.
माहितीनुसार, (Pusad Tehsil) पुसद तहसील कार्यालयातील बाळू पवार असे या लिपिकाचे नाव आहे. बाळू हा जन्म-मृत्यू विभागातील सेतूमध्ये कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी गजानन तोडक यांनी तहसीलमध्ये वडिलांच्या नावाची मृत्यूची नोंद घेण्याकरिता रीतसर अर्ज सादर केला. गजानन तोडक यांचे वडील तुकाराम यांचा मृत्यू २९ फेब्रुवारी १९७४ ला झाला. त्यावेळी काही कारणास्तव मृत्यू नोंद करण्यात आली नव्हती. मात्र आता त्यांचे सुपुत्र गजानन तोडक हे अनेक दिवसांपासून तहसील मधील या कार्यालयात चकरा मारीत होते. अर्ज देऊन दोन महिने झाले तरी संबंधित लिपिक नोंद करीत नव्हता. याच्यासह तालुक्यातील व शहरातील इतरही नागरिकांना त्रास विविध दाखल्यांसाठी हा लिपिक त्रास देत होता.
प्रत्येक दाखल्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मागित होता. हे विशेष. याच्या संदर्भात काही दिवसां अगोदर दैनिक देशोन्नती मध्ये या लिपिकाचे फोटोसह वृत्त प्रकाशित झाले होते हे विशेष. याच्या कारणांचा कळस इतका झाला की, खुद्द (Pusad Tehsil) तहसीलदारांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्या समक्ष पैसे घेतल्याची कबुली देऊन, सर्वच विभागातील शासकीय कर्मचारी पैसे घेऊन असतात नागरिकांची फुकट काम करायचे का असा सवालही त्यांनी तहसीलदारांना विचारलं याच्यापेक्षा दुर्दैव काय? तहसीलदारांनी तात्काळ दखल घेत संबंधित लिपिक बाळू पवार याला तीन महिन्याकरिता निलंबित केले आहे. मात्र तक्रारदार त्यांनी संबंधित बडतर्फ करावे अशी मागणी तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
ग्रामीण भागातून येणाऱ्या गरिबांना प्रत्येक कामासाठी अडवणूक केली जात होती. पैशाची मागणी ही नित्याचीच बाब झाली होती. सर्वांसमोरच पैसे मागणारा लिपिक चर्चेत होता. कारवाईने समाधान व्यक्त होत आहे.
या (Pusad Tehsil) घटनेवरून शासकीय सर्वच कार्यालयांमध्ये विशेष करून पोलीस विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण विभाग, महसूल विभाग यासह अत्यंत दुर्लक्षित असलेले सिंचन विभाग जलसंपदा विभाग यामध्येही मोठ्या प्रमाणात असाच भ्रष्टाचार व नागरिकांना त्रास देण्याचे काम सुरू आहेत तर आता ठामपणे उभे ठाकणे गरजेचे आहे.