पुसद (CM Ladki Bahin Yojana) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या वतीने राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सर्वच पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये ” मुख्यमंत्री लाडली बहीण ” या (CM Ladki Bahin Yojana) योजनेच्या माध्यमातून देण्याची घोषणा केली. योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलांना स्वतःचा व्हाट्सअप चालणारा मोबाईल नंबर, राशन कार्ड ची झेरॉक्स, आधार कार्डाची झेरॉक्स, मतदान करण्याची झेरॉक्स, बँक पासबुक ची झेरॉक्स व शाळेचा दाखला / निर्गम असल्यास असे कागदपत्र फॉर्म ला जोडून सेतू सेवा केंद्र, आपल्या मोबाईलवर ॲप डाऊनलोड करून, किंवा (Pusad Tehsil) परिसरातील आपल्या अंगणवाडी सेविका सदरील अर्ज द्यावयाचे आहेत.
पुसद तहसील परिसरात ” मुख्यमंत्री लाडली बहीण ” (CM Ladki Bahin Yojana) या योजनेच्या संदर्भात महिलांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये अथवा अचूक माहिती मिळावी याकरिता आमदार इंद्रनील नाईक व सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी नाईक यांच्या माध्यमातून पेंडॉल टाकून लाडला बहिणींना मार्गदर्शन करण्यात येत आहे व त्यांच्याकडून सदरील योजनेस संदर्भात अर्ज घेतल्या जात आहेत. Pusad Tehsil महिलांच्या मोबाईल नंबर वर ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी संबंधित व्यक्तीला सांगितल्यानंतर त्यांचा अर्ज भरल्याची पावती त्यांच्या मोबाईल नंबर वर मिळणार आहे.
या (CM Ladki Bahin Yojana) योजनेचा लाभ मिळविण्यासाठी तालुक्यातील सर्वच खेड्यापाड्यातून महिलांचा लोंढा शहरामध्ये दाखल होत आहे. (Pusad Tehsil) तहसील परिसरात दि. 15 जुलै रोजी जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत होते.या पात्र महिलांना राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी रक्षाबंधनाच्या पर्वावर तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात टाकण्याची घोषणा केली आहे.यामुळे तालुक्यासह शहरातील समस्त लाडल्या बहिणींमध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे हे विशेष.