पुसद (Pusad Tehsil) : पुरवठा विभागामार्फत राशन कार्ड वरील नावे ऑनलाइन केवायसी (Online KYC) करण्यासाठी स्वस्त धान्य लाभार्थ्यांना या ठिकाणी आपले आधार कार्ड नोंदवून ऑनलाइन केवायसी करून घ्यावी लागते. त्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत विभागामार्फत त्याचा मिळतो. मात्र (Pusad Tehsil) पुसद तहसील मधील पुरवठा विभागामार्फत (Supply Department) ऑनलाइन विषयक कामकाज करण्यासाठी एक विशेष ऑफिस बनविण्यात आले आहे. या ठिकाणी नागरिकांनी आपली कागदपत्रे देऊन व प्रत्यक्ष उपस्थित राहून ऑनलाइन विषयक कामकाज करून घ्यावे लागते.
नागरिक त्रस्त, ऑफिस समोर नागरिक ताटकळत
मात्र गेल्या काही दिवसांपासून पुसद तहसील मधील पुरवठा विभागामध्ये सावळा गोंधळ सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तर ऑनलाईन विषयक कामकाज करण्यासाठी नागरिक खेड्यापाड्यातून लांबून पदर मोड करून गोरगरीब अबाल वृद्ध येत असतात. मात्र (Pusad Tehsil) शासनाचे कायमस्वरूपी कर्मचारी या (Supply Department) पुरवठा विभागाच्या ऑनलाईन विषयक कामकाज करण्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.
मात्र साईट बंद चे कारण सांगून संबंधित कर्मचारी हा ऑफिस बंद ठेवून तहसील परिसरातच फिरताना दिसत होते. उपविभागीय अधिकारी आशिष भुजबळ व तहसीलदार महादेवराव जोरवर यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करण्यात येऊ नये, याकरिता काही उपाययोजना करून शासकीय कर्मचारी याकरिता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.