पुसद (Pusad Traffic) : ऊस शहरांमध्ये पुन्हा काही टवाळखोर गर्भ श्रीमंतांची मुले कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या फटाका बुलेट चा वापर मोठ्या प्रमाणात करीत असून विशेष करून ही टवाळखोर मुले मुख्य बाजारपेठ महिला शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा वावर असलेल्या (Pusad Traffic) परिसरात तसेच शहरातील प्रत्येक कोचिंग क्लासेसच्या लगत शाळेच्या लगत शाळा व कोचिंग क्लासेस भरताना व सुटताना ही ठेवाळखोर मुले रस्त्याने भरधाव वेगाने करण कर्कश्य आवाज करीत बुलेट पळवीत आहेत. तर महिलांची काय करी विद्यार्थिनींची छेड काढण्याच्या उद्देशाने विशिष्ट काही टवाळखोर मुलांकडून मोहीम सुरू केल्या गेल्याची चर्चा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
प्रत्यक्षात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक (Pusad Police) जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या निवासस्थानालगत अनेक कोचिंग क्लासेस असून त्यांनाही आवाजाचा फटका बसलेला आहे. तर पुसद मध्ये येत्या काळात मोहरम आषाढी एकादशी ते सण साजरे होणार आहेत. काही समाजकंटकांकडून या सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता वाहतूक शाखेने व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने या कृतीकडे बघणे गरजेचे आहे. शहरात विनापरवाना सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक, सोबतच विनापरवाना शहरात असंख्य कुठलीही कागदपत्रे नसणारी ऑटो फिरत असून शहरातील वाहतूक व्यवस्थेला गालबोट लावण्याची कार्य या अवैध विनापरवाना (Pusad Traffic) व कागदपत्रे नसणाऱ्या ऑटो चालकांकडून केल्या जात आहे. (Pusad Police) पोलीस प्रशासनाने विशेष करून सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी पंकज अतुलकर यांनीच आता ॲक्शन मोडवर येणे गरजेचे आहे हे विशेष व सोबतच सध्याची परिस्थिती बघता शहरात दामिनी पथक एका विशिष्ट महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात निर्माण करणे गरजेचे आहे.