छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक कोंडी
पुसद (Pusad Traffic) : शहरातील हार्ट ऑफ सिटी (Pusad District) म्हणून गणल्या गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात टीव्ही केंद्राकडून येणारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जाणारी वाहतूक एकत्र होत असल्याने सातत्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होत आहे. शहरातील या चौकामध्ये चारी दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असते. तर शहरांमध्ये टीव्ही केंद्राकडे जाणाऱ्या बस स्थानक परिसराकडे वाहनांची व केंद्राकडून येणाऱ्या वाहनांची गर्दी होत असल्यामुळे या परिसरात सातत्याने (Traffic jam) वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. सदरील वाहतूक व्यवस्था एकेरी पद्धतीने करणे गरजेचे आहे. उपजिल्हा वाहतूक शाखा पुसदने (Pusad Traffic) व प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. त्यानुसार उपाययोजना करून (Traffic jam) वाहतूक कोंडीची समस्या सोडविणे गरजेचे आहे.