पुसद (Pusad):- तालुक्यासह नांदेड आदिलाबाद येथून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय निमशासकीय बांधकामे सुरू असल्यामुळे बांधकाम साहित्याची अत्यंत गरज नागरिकांना भासत आहे. मात्र या व्यवसायामध्ये कमी वेळेमध्ये जास्त पैसा मिळत असल्यामुळे गुंड प्रवृत्तीसह ही राजकारण्यांनी ही सहभाग घेतला आहे. यामुळे या व्यवसायामध्ये आपसी स्पर्धा वाढून सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. व शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे (Illegal sand) ठिय्ये निर्माण केल्या गेले आहेत. तर याची अंतर्गत वाहतूक करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाकडून (District Mining Department) असणारा परवाना एकाही डुगे वाल्याजवळ आढळून येत नाही.
अवैध शहरातील रेतीचे ठिय्ये, तथा मुरूम, वाळूची वाहतूक बंद होणार का..?
मात्र शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने एवढंच नव्हे तर सिग्नल व्यवस्थेलाही न जुमानता याचे चालक रस्त्यावरील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. एवढं सगळं दिसूनही उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल तहसीलदार महादेवराव जोरवर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार च्या व्यतिरिक्त स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सर्व पोलीस स्टेशनचे डीबी पथक हे मात्र आपलं कर्तव्य बजावण्यामध्ये अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. आता याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, एलसीबी पोलीस निरीक्षक यवतमाळ ज्ञानोबा देवकते, व सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आता यांनीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.