पुसद (Police Administration) : पुसद शहरातील अत्यंत उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या वारको सिटी परिसरात समाजकंटकांसह व्यसनाधीन झालेल्या तरुणांचा हैदोस सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसा हा परिसर (Vasantnagar Police) वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येतो, हा परिसर अत्यंत संवेदनशील असून या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचा वावर असतो, तर या ठिकाणी व या परिसरात हत्या लुटमार सारखे गुन्हे घडले आहेत.
या भागातील सर्वसामान्य नागरिकांना रहिवाशांना आपणच घेतलेल्या परिसरामध्ये फिरता येत नाही यापेक्षा शोकांतिका कोणती. सायंकाळच्या सहा वाजल्यापासूनच व्यसनाधीन झालेले तरुणांचे टोळके उघडपणे दारूचे सेवन करत असतात. या गंभीर बाबीकडे मात्र संबंधित पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (Vasantnagar Police) वसंतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या (Police Administration) अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना या परिसरात गस्त घालण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी या परिसरातील नागरिकांची आहे.