पुसद(Yawatmal):- कधी नव्हे ती पुसद विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगात येत असल्याचे चित्र आहे. 4 ऑक्टोंबर रोजी नामांकन अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. मात्र विद्यमान आमदारांना जेष्ठ बंधू यांचेकडूनच तीव्र विरोध होताना दिसत आहे. कारण ययाती नाईक यांनी त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून नामांकनही दाखल केलेले आहे. माजी मंत्री मनोहर नाईक, माजी नगराध्यक्षा सौ. अनिता नाईक या जन्म दात्या माता पित्याला आपल्या दोन्ही पुत्रातील राजकीय वाद शमविता आलेला नाही.
दोन्ही पुत्रातील राजकीय वाद शमविता आलेला नाही
ज्येष्ठ पुत्रवर आई वडील अन्याय करीत असल्याची भावना त्यांच्या सौभाग्यवतीसह मित्र व कार्यकर्ते मंडळात निर्माण झालेली आहे. खरे त्यांनी प्रथम आपल्या ज्येष्ठ पुत्राला न्याय देताना विधानसभेची (Assembly) पहिली निवडणूक आपल्या कनिष्ठ चिरंजीवा ऐवजी ज्येष्ठ पुत्राला संधी दिली असती तर ते न्याय संगतही होते. कारण त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून अत्यंत कुशल कारभार केलेला होता. राजकीय जीवनामध्ये ते विद्यमान आमदारांपेक्षा अगोदर सक्रिय झालेले होते. मात्र आई-वडिलांकडूनच राजकीय दृष्ट्या डावलेल्या गेल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. हीच भावना पुसद विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवणार आहे. महाविकास आघाडीचे विद्यमान अधिकृत उमेदवार शरद आप्पाराव मैंद यांना वाढता पाठिंबा हे त्याचे धोतक आहे. प्रथमच पुसदच्या बंगल्यामध्ये स्मशान शांतता निर्माण झालेल्याचे चित्र आहे. ययाती नाईक यांनी कारंजा मतदार संघात (Constituencies) देखील अर्ज दाखल केला असला तरी त्यांनी पुसद मधूनच निवडणुक लढवून आपली राजकीय ताकत दाखवावी अशी अपेक्षा त्यांना साथ देणारे कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. एकूणच यावेळी महायुती व महाविकास आघाडीतील लढत अतिशय चुरशिची होईल. आणि माता-पितांनी ज्येष्ठ पुत्रांचा केलेला अपमान याचा मतदान रुपी बदला घेण्यासाठी समाजही मनातून तयार झालेला दिसत आहे.