पूसधरणावरील वनवारला येथील डीपी दुरुस्तीचे युद्ध पातळीवर काम
पुसद (Pusad water supply) : गेल्या दोन-तीन दिवसापासून शहरासह तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळ वाऱ्यासह पाऊस कोसळला. तर वादळ वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची विद्युत वहिनींचे नुकसान होऊन विद्युत पुरवठा (power supply) खंडित होण्याचे प्रकार घडले तर वादळ वाऱ्यामुळे तालुक्यातील चोंडी येथील सर्विस स्टेशन वरून धरणावरील (water supply) पाणीपुरवठा करणाऱ्या सब स्टेशन वरील लाईन खंडित होत असल्यामुळे. धरणातील (water treatment plant) पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यास मोठा अडथळा निर्माण होत होता. तर पाणी आल्यामुळे (Pusad Nagar parishad) पुसद नगरपरिषद पाणीपुरवठा विभागामार्फत नळ ग्राहकांना होणारा पाणीपुरवठा बंद होता.
जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत धरणातील पाणी पोहोचले नाही
याची गांभीर्याने दखल घेत संबंधित (water supply) पाणीपुरवठा विभागाचे विभाग प्रमुख माधवराव पाटील, जलदाय विभागाचे अभियंता सलाउद्दीन, यांचे सहकारी तर महावितरण चे अभियंता लाईनमन इत्यादी कर्मचारी यांनी सदरील विद्युत पुरवठा (power supply) सुरळीत व्हावा व वादळ वाऱ्यामुळे विद्युत वाहिनीचे झालेले नुकसान डीपीची दि. 20 रोजी युद्ध पातळीवर दुरुस्ती केली. जेणेकरून धरणातील (water treatment plant) जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येण्यास अडथळा निर्माण होऊ नये व नागरिकांना उद्या पाणीपुरवठा करता यावा याकरिता या सर्वांनीच अथक परीक्षण घेतले. मुख्याधिकारी तथा प्रशासक (Pusad Nagar parishad) नगरपरिषद पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्वांनी कर्तव्य बजावले हे विशेष.