सिलिंग फॅनला गळफास घेऊन युवतीची आत्महत्या
पुसद (Pusad):- ग्रामीण पोलीस स्टेशन अतर्गत येत असलेल्या तालुक्यातील वेणी खुर्द येथे एका युवतीने दि.२७ एप्रिल रोजी आठ वाजताच्या दरम्यान एका 19 वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरी सिलिंग फॅनला अंगावरील निळ्या रंगाच्या ओढणीने बांधून गळफास (Hanged with rope) घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
तरुण-तरुणीच्या आत्महत्येने पुसद हादरले !
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद किसन जाधव ४३ वर्ष रा. वेणी खुर्द यांनी ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीच्या मोठ्या भावाची मुलगी मृतक स्नेहल उर्फ सिया राजेश जाधव वय १९ वर्ष रा. वेणी खु. हिने घरातील सिलिंग फॅन ला अंगावरील निळ्या रंगाच्या ओढणीने बांधून गळफास लावून आत्महत्या(suicide) केल्याची फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्ग दाखल. घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेख मकसद पोलीस कॉन्स्टेबल योगेश आळणे करीत आहेत.
सलग २७ व २८ एप्रिल रोजी तालुक्यातील गाजीपुर व वेणी खुर्द येथील नव तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटनेत आत्महत्येचे कारण नेमके काय हे अदपही अस्पष्ट आहे.