पुसद (Brahmin Samaj) : ब्राम्हण समाजाच्या (Brahmin Samaj) सर्वांगीण उन्नती करीता गेल्या अनेक दिवसांपासून भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापण करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र ती शासनाने अजूनही पूर्ण केली नसल्याने जालना येथील ब्रम्म सेवक दिपक रणनवरे यांनी १५ऑगस्ट पासून गांधी चौक जालना येथे आमरण उपोषणा सुरु केले आहे.
ब्राह्मण समाजाच्या (Brahmin Samaj) आर्थिक उन्नती करीता भगवान परशुराम महामंडळासाठी त्यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून पुसद येथील ब्रम्हवृंदासह अ.भा. ब्राम्हण महासंघाचे तालुका अध्यक्ष एड.विरेंद्र जगजीवन राजे, महीला आघाडी तालुका अध्यक्ष सौ. सविता नंदकुमार जोशी पारटकर, शहर अध्यक्ष संतोष शेवाळकर,सचिव नागेश गांधे,नंदकुमार जोशी, सतिश पारटकर, श्रीकांत बन्सोडे, प्रमोदराव रायपुरकर, गोविंदजी लिगदे, दिपा भोरे, संध्या देशपांडे, मिना भगवतकर, बहादूरे, वैशाली जोशी ताई, सुशिल दिक्षित, अश्वीनी राजे इत्यादीनी भेट दिली व त्यांना जाहीर पाठिंबा दिला.