पुसद (Yawatmal):- होणार… होणार…होणार… म्हणता बऱ्याच वर्षापासून पुसद शहर व तालुक्यातील जनता ज्याची वाट पाहत होते. त्या रिंग रोडचा दि. ३० नोव्हेंबर पासून वाशिम रोड वरील निंबी गावाजवळून सर्वे सुरू झाला असल्याची माहिती रिंग रोड कृती समितीचे अध्यक्ष अशोक शंकरराव बाबर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही
सदर सर्वे हा पिंपरी चिंचवड (Pune) येथील सार्थक कंपनी करीत आहे पुसदच्या रिंगरोड सर्व्हेचे (Ring Road Survey) काम पुन्हा एकदा चर्चेत इंजिनिअरिंगचे आशिष शहा व त्यांचे सहकारी अनिकेत भिसे रा. कोल्हापूर यांचे मार्फत शासनाच्या वतीने काढलेल्या निविदा नुसार काम सुरू झाले असल्याचे बाबर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. सदर काम होण्याकरिता सार्वजनिक बांधकाम (Public works) प्रादेशिक विभाग अमरावतीचे मुख्य कार्यकारी अभियंता गिरीश जोशी, सार्वजनिक बांधकाम मंडळ यवतमाळचे अधीक्षक अभियंता सी.यु. मेहत्रे, सार्वजनिक बांधकाम विभाग(PWD) पुसदच्या कार्यकारी अभियंता कु.प्रिया पुजारी, सार्वजनिक बांधकाम विभाग पुसदचे उप अभियंता प्रकाश झळके या सर्व अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे सदर रिंगरोड सर्वे चे काम सुरू झाल्याचा अशोक शंकरराव बाबर यांनी प्रसिद्धी पत्रकात आवर्जून उल्लेख केला आहे.
मात्र या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे यापूर्वी देखील रिंग रोड सर्व्हेचे काम सुरु होऊन थंडबस्त्यात पडले होते. कालपासून सुरु झालेला सर्व्हे पाहता निधी ची उपलब्धता झाल्यास पुढील काम नार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.