अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ (pushpa 2) : या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर रिलीज डेट आज सोमवारी जाहीर करण्यात आली आहे.
‘पुष्पा-2 द रुल’ हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अल्लू अर्जुन (allu arjun) आणि रश्मिका मंदान्ना (rashmika mandanna) यांचा चित्रपट पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी याचा ट्रेलर याच महिन्यात रिलीज होणार आहे. त्याची तारीख निर्मात्यांनी आज सोमवारी जाहीर केली आहे. तसेच ट्रेलर (trailer) कुठे प्रदर्शित होणार आहे हे देखील सांगितले आहे.
ना मुंबई, ना हैदराबाद… या शहरात पुष्पराज पोहोचणार
पुष्पा 2 चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत(Mumbai) प्रदर्शित होणार नाही, हैदराबाद किंवा दिल्लीतही प्रदर्शित होणार नाही. या चित्रपटाचा ट्रेलर बिहारची राजधानी पाटणा 17 नोव्हेंबर 2024 येथे प्रदर्शित होणार आहे.