हिंगोली(hingoli):- जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी पाच लाख शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे(Insurance company) आपल्या पिकाचा विमा उतरवला होता. मात्र खरीप मधील नुकसानी होऊन सुद्धा फक्त एक लाख 54 हजार एवढे शेतकऱ्यांनाच विमा मिळाला अनेक शेतकरी पिक विमा पासून वंचित राहिले त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम पिक विमा कंपनीने केली.
शेतकऱ्यांनी दिला कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात ठिय्या
त्यानंतर रब्बी च्या हंगामामध्ये दोन लाखाच्या वरील शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यामध्ये हरभरा, गहू , करडई ,मका आधी पिकांचा समावेश होता दोन लाख शेतकऱ्यांची नुकसान(damage) झाल्यानंतर त्यापैकी फक्त 13 हजार शेतकऱ्यांच्या हातावर कंपनीने तोकङा विमा टाकल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या दालनात ठिय्या मांडल्याने कृषी कार्यालयामध्ये (Agricultural Offices) काही वेळ तणाव निर्माण झाला होता. यामध्ये शेतकऱ्यांनी विमा कंपनीचे प्रतिनिधी बोलवा तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतली आहे. यावेळी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, विठ्ठल धाकतोडे, गजानन जाधव, नारायण गिरी, भानुदास आगलावे, विशाल पौळ, गजानन आगलावे, शिवाजी नायक, माधव नायक यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.