मानोरा (Washim) :- तालुक्यातील रोहना येथे खुलेआम सुरू असलेल्या गावठी दारु(Alcohol) विक्रीला आळा घालावा, यासाठी गावातील महिलांनी पोलीस स्टेशनला धडक देवून दारू बंदीकरीता ठाणेदार यांना निवेदन सादर केले.
गावठी दारूची खुलेआम विक्री
रोहना गावात खुलेआम राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध गावठी दारु विक्रीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत असून घराघरात भांडण तंटयात वाढ होत आहे. दारुमुळे काही महीला माहेरी जाऊन बसल्या आहेत. अनेक महिलांचे दारुपयी उद्ध्वस्त होणारे संसार वाचविण्यासाठी अवैध दारू विक्री (Illegal sale of alcohol) करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी तक्रार निवेदनाद्वारे मागणी महिलांनी केली आहे. निवेदनावर तुळजा देवी महीला बचत गट, बिरसा मुंडा महीला बचत गट, सामकी माता महीला बचत गट व रमाई महीला बचत गटाच्या पदाधिकारी मंदाबाई राठोड, उमिता पवार, वैशाली पारधी, सारिका राठोड, मनिबाई चव्हाण, मनीषा भारसाकले, दुर्गाबाई राठोड, यशोदा जाधव, यशोदा सातपुते, तुळजा पारधी, निर्मला राठोड, वनमाला लडके, सुमित्रा पवार, निता पवार, वैशाली चव्हाण, नंदा कुऱ्हाडे, बाली शिंदे, नंदा पवार, रंजना लोखंडे, रेखा चव्हाण, पायल पवार, नैना चव्हाण, लता पवार आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.