चिखली (Buldhana):- राहुल बोंद्रे यांनी मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीची स्थापना केली परिसरातील शेतकऱ्यांना सुतगिणीच्या माध्यमातून विकासाची मोठी स्वप्न दाखवली. मात्र सहकाराच्या माध्यमातून शासनाचे अनुदान लाटत जिल्हा बँकेचे कर्ज घेत सहकाराच्या नावाखाली स्वाहाकार केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे(Farmers Association) नेते समाधान कणखर यांनी एका प्रसिद्धीपत्रकारद्वारे केला आहे.
सुतगिरणीने सन 1994 मध्ये जिल्हा सहकारी बँकेकडून घेतले कर्ज
प्रतिपत्रकातून कणखर यांनी मांडले आहे की राहूल बोंद्रे यांनी “मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणी”स्थापणा केली.प्रत्येक सहकारी सुतगिरणी मध्ये सभासद भागभांडवल 5 % शासकीय भागभांडवल 45 % व 50% अशा पध्दतीने भागभांडवलाची उभारणी होते.नियमाप्रमाणे सहकारी सुतगिरणी 25536 चात्यांची असणे आवश्यक असणे गरजेचे आहे व त्याकरीता 1 लक्ष 25000 चौ फुट बांधकाम करणे पण आवश्यक आहे.राहूल बोंद्रे यांनी केवळ 60,000 चौ फूट बांधकाम केले व शासनाची फसवणूक केली.जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले.परंतु कर्जाची परतफेड अजूनही केलेली नाही. मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीने सन 1994 मध्ये जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज घेतले. नंतर सदर कर्ज अनुत्पादक झाले. कर्ज अनुत्पादक झालेले जिल्हा बँक अडचणीत आली.कारण एकट्या राहूल बोंद्रेशी संबंधित 2 संस्थांचे 94 कोटी रुपये थकीत आहेत. या प्रकरणी राहूल बोंद्रे यांची मा.उच्च न्यायालयाच्या बहूमोल वेळ वाया घालवला आहे तसेच शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
मा.उच्च न्यायालयात 27 कोटी 51 लक्ष रुपयांचे कर्ज वसुलीसाठी राहूल बोंद्रे यांनी घेतली स्थगिती
मुंगसाजी महाराज सह सुतगिरणी – (27,51,16,083/- रु) थकीत प्मारकरणी सहकार न्यायालयाने, कर्ज वसुलीकरीता वाद-प्रतिवाद झाल्यानंतर आदेश दिला. सदर आदेश दिल्यानंतर मा.उच्च न्यायालयात 27 कोटी 51 लक्ष रुपयांचे कर्ज वसुलीसाठी राहूल बोंद्रे यांनी स्थगिती घेतली. आजपर्यंत सदर स्थगिती कायम आहे. एकंदरीतच सूतगिरणी उभारण्याच्या नावाखाली कापूस फेडरेशन कडून शेतकऱ्याचे तीन टक्के शेअर्स स्वतःच्या सूतगिरणीच्या नावाने वळते करून घेतले आणि सहकाराचा मुलांमा दाखवत सहकारी सूतगिरणीच माध्यमातून शेतकरी, शासन व जिल्हा बँकेतील पैशाचा स्वाहाकार केल्याचा आरोप शेतकरी नेते समाधान कणखर यांनी शेवटी केला आहे.