नवी दिल्ली (Rahul Gandhi) : देशातील सर्वाधिक लोकप्रिय लोकसभा (LokSabha elections) अमेठी आणि रायबरेली जागांबाबत गूढ कायम आहे. अमेठी आणि रायबरेलीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. या मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे काँग्रेसने (Congress Election) अद्याप जाहीर केलेली नाहीत. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली असून, राहुल गांधींनी अमेठीसाठी संमती दिल्याची माहिती आहे. या माहिती नंतर अमेठीपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली आहे. संध्याकाळपर्यंत काँग्रेस पक्ष अमेठीसाठी (Rahul Gandhi) राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. येथे CLICK करा : काँग्रेसने दुसरी यादी जाहीर
माहितीनुसार, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे खासदार प्रतिनिधी आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव किशोरी लाल शर्मा उमेदवारी अर्जाच्या तयारीच्या संदर्भात अमेठीत पोहोचले आहेत. त्यानंतर आज संध्याकाळपर्यंत काँग्रेस राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज संध्याकाळपर्यंत अधिकृत घोषणा
किशोरीलाल शर्मा यांच्या वतीने अमेठीतून गांधी घराण्यातील व्यक्तीच निवडणूक (Assembly Election) लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गांधी घराण्यातील सदस्याने अमेठीतून निवडणूक लढवावी, अशी पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी आज घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले. सीईसीने मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सर्व जबाबदारी सोपवली आहे. आज संध्याकाळपर्यंत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
दोघेही आमचे स्टार प्रचारक
जयराम रमेश म्हणाले की, (Rahul Gandhi) राहुल गांधींनी अमेठीतून आणि प्रियंका गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा आहे. पण त्यांना संपूर्ण देशात प्रचार करावा लागेल. हे दोघेही आमचे स्टार प्रचारक आहेत. पण सीईसी, काँग्रेस संघटना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना (Rahul Gandhi congress) राहुल गांधी यांनी अमेठीतून आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी इच्छा आहे.
3 मे रोजी काँग्रेसचा रोड शो
अमेठीबाबतची परिस्थिती सध्या स्पष्ट झाली असली तरी, रायबरेलीबाबत सस्पेन्स कायम आहे. या जागेवर (Priyanka Gandhi) प्रियांका गांधी निवडणूक लढवण्यासाठी जोरदार जोर लावला जात आहे. रायबरेलीतही तयारी जोरात सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 3 मे रोजी काँग्रेस रायबरेलीमध्ये रोड शो करणार आहे. रायबरेली जिल्हा युनिटच्या बैठकीत, मेगा रोड-शोसाठी नेते आणि कार्यकर्त्यांना आपली पूर्ण ताकद लावण्यास सांगण्यात आले आहे.
गांधी-नेहरू घराण्याचे पारंपरिक क्षेत्र
अमेठी आणि रायबरेली हे गांधी-नेहरू घराण्याचे पारंपरिक क्षेत्र मानले जातात. या जागेवरून गांधी घराण्यातील सदस्य अनेक दशकांपासून निवडणूक लढवत आहेत आणि येथून संसदेत जात आहेत. गेल्या वेळी (Rahul Gandhi news) राहुल गांधी अमेठीतून स्मृती इराणी यांच्याकडून निवडणूक हरले होते. या मतदारसंघातून ते सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. 20 मे रोजी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात पाचव्या फेरीचे मतदान होणार आहे.