रायबरेली (rahul gandhi) : राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आज सकाळीच काँग्रेसने अमेठी आणि रायबरेलीच्या जागा जाहीर केल्या. राहुल गांधी (rahul gandhi) यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) , तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते.
येथे click करा : अखेर राहुल गांधीं रायबरेलीतून निवडणुकीच्या दंगलीत
आज सकाळीच राहुल गांधी (rahul gandhi) विशेष विमानाने दिल्लीहून फुरसातगंजला पोहोचले. तेथून अमेठीमार्गे रायबरेलीला आले. (RaeBareli LokSabha) रायबरेली येथील केंद्रीय काँग्रेस कार्यालयात पूजा केल्यानंतर राहुल यांची नामांकन मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. यापूर्वी राहुल गांधींना या पूजेला उपस्थित राहून रथाप्रमाणे खुल्या ट्रकमध्ये उमेदवारी दाखल करण्यासाठी जायचे होते. मात्र उमेदवारी दाखल करण्यास होणारा विलंब पाहून ते थेट त्यांच्या बंद वाहनातून रवाना झाले.
मिरवणुकीत मोठा उत्साह
हाती पार्क येथील काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयापासून राहुल गांधी (rahul gandhi) यांची नामांकन मिरवणूक निघाली. फिरोज गांधी चौक मार्गे ही मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. या मिरवणुकीत मोठी गर्दी दिसून आली. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. (rahul gandhi) राहुल यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे काँग्रेसवाले बोलत राहिले. या मिरवणुकीत काँग्रेससोबत सपाचे कार्यकर्तेही दिसत होते.
भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप यांचा सामना राहुल गांधीशी
रायबरेली लोकसभा (RaeBareli LokSabha) जागेवर भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंग सलग दुस-यांदा गांधी परिवाराशी भिडणार आहेत. दिनेश प्रताप सिंह यांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जापूर्वीच अर्ज दाखल केला. 2019 मध्ये दिनेश प्रताप सिंह यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यांनी एकेकाळी काँग्रेसला आव्हान दिले होते पण निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. 2018 मध्ये दिनेश प्रताप सिंह यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. सोनिया गांधी यांना 5,31,918 मते मिळाली. भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांना 3,67,740 मते मिळाली. दिनेश प्रताप यांचा 1,64,178 मतांनी पराभव झाला होता.
सोनिया गांधी यांनी दिलेले वचन पूर्ण
राज्यसभेवर जाण्यापूर्वी खासदार सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी रायबरेलीच्या जनतेला एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले होते. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हापासून गांधी घराण्यातील कोणीतरी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. येथून प्रियंका गांधी यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र यावेळी त्यांचे भाऊ राहुल गांधी (rahul gandhi) निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले.