Kangana Ranaut On Rahul Gandhi:- अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मंडीतील खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut ) काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या नुकत्याच आलेल्या अहवालाबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यावर कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चच्या नुकत्याच आलेल्या अहवालाबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया
हिंडेनबर्ग (Hindenburg) अहवालात सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी(Narendra Modi) सरकारवर हल्लाबोल केला. यावर टीका करताना कंगना राणौत म्हणाली की, राहुल गांधी हे सर्वात धोकादायक व्यक्ती असून ते देशाची अर्थव्यवस्था (economy) अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. कंगना राणौत म्हणाली- ‘राहुल गांधी सर्वात खतरनाक माणूस आहे’ कंगनाने सोमवारी राहुल गांधींना सर्वात खतरनाक माणूस म्हटले. देश तुम्हाला नेता म्हणून कधीही निवडणार नाही, असे कंगनाने म्हटले आहे. कंगना राणौतने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “राहुल गांधी हे सर्वात धोकादायक व्यक्ती आहेत, ते कडू, विषारी आणि विध्वंसक आहेत, त्यांचा अजेंडा असा आहे की जर ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत तर ते या देशाला नष्ट करू शकतात.”
आयुष्यभर विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवा-कंगना रणौत
कंगना म्हणाली, राहुल गांधी अर्थव्यवस्थेला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते या देशाची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.” कंगना रणौत म्हणाली- राहुल गांधी, आयुष्यभर विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवा, कंगना राणावत पुढे म्हणाली, ”राहुल गांधी, तुम्ही. आयुष्यभर विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवा आणि जसा त्रास सहन करावा लागत आहे, तसाच या देशातील जनतेचा अभिमान, विकास आणि राष्ट्रवादही भोगायला तयार व्हा. ते तुम्हाला त्यांचा नेता कधीच बनवणार नाहीत. तू डागासारखा आहेस.” हिंडेनबर्ग अहवालावर राहुल गांधी काय म्हणाले? हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या ताज्या आरोपानंतर राहुल गांधी यांनी भारताच्या शेअर बाजाराच्या अखंडतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी SEBI प्रमुख माधबी पुरी बुच यांच्याशी संबंधित संभाव्य हितसंबंधांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. माधवी बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित करत सरकारकडे उत्तरे मागितली आहेत.