नवी दिल्ली/मुंबई (Rahul Gandhi on Maharastra Badlapur Case) : एकीकडे कोलकाता घटनेनंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे नुकतेच महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये शाळेच्या स्वच्छतागृहात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यानंतर (Badlapur Harassment Case) बदलापूरमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आता बदलापूरमधील लैंगिक छळ प्रकरणाच्या निषेधाच्या एका दिवसानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आता चांगलेच संतापले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, FIR नोंदवण्यासाठी आंदोलन करणार का?, बहिणी आणि मुलींवरील वाढत्या गुन्ह्याचा निषेध करत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी न्याय देण्याऐवजी गुन्हा लपवण्याच्या प्रयत्नांवर जोरदार टीका केली.
‘समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत?’
काँग्रेस खासदार (Rahul Gandhi) राहुल गांधी यांनी (Badlapur Harassment Case) बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांच्या निष्क्रीयतेवर टीका केली. “न्याय देण्यापेक्षा गुन्हा लपवण्याचा अधिक प्रयत्न केला जात आहे”. आपल्या X पोस्टमध्ये राहुल गांधींनी लिहिले की, “पश्चिम बंगाल, यूपी, बिहारनंतर महाराष्ट्रातही मुलींवरील लाजिरवाण्या गुन्ह्यांमुळे आपण समाज म्हणून कुठे चाललो आहोत?”
पश्चिम बंगाल, यूपी, बिहार के बाद महाराष्ट्र में भी बेटियों के खिलाफ शर्मनाक अपराध सोचने पर मजबूर करते हैं कि हम एक समाज के तौर पर कहां जा रहे हैं?
बदलापुर में दो मासूमों के साथ हुए अपराध के बाद उनको इंसाफ दिलाने के लिए पहला कदम तब तक नहीं उठाया गया जब तक जनता ‘न्याय की गुहार’…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 21, 2024
आता FIR नोंदवण्यासाठी आंदोलन करावे लागेल का?
राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे म्हणाले की, (Badlapur Harassment Case) बदलापूरमध्ये दोन निरपराध मुलींवर झालेल्या गुन्ह्य़ानंतर जनता ‘न्यायासाठी याचना’ करत रस्त्यावर येईपर्यंत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पहिले पाऊल उचलले जात नाही. आता FIR नोंदवण्यासाठी आंदोलन करावे लागेल का? अखेर पीडितांना पोलीस ठाण्यात जाणेही अवघड का झाले आहे?
गुन्हे लपवण्यासाठी आणखी प्रयत्न : राहुल
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी व्यवस्थेवर जोरदार हल्ला चढवला आणि सांगितले की, न्याय मिळवून देण्यापेक्षा गुन्हे लपविण्याचे अधिक प्रयत्न केले जातात, ज्याचा सर्वात मोठा बळी महिला आणि दुर्बल घटकातील लोक आहेत. FIR न नोंदवल्याने केवळ पीडितांना निराश होत नाही तर गुन्हेगारांना धीरही मिळतो.
‘न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क’
समाजातील महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत याचा सर्व सरकारे, नागरिक आणि राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार करावा लागेल, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, तो पोलिस आणि प्रशासनाच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नाही.