वॉशिंग्टन : (Rahul Gandhi on reservation )विधानसभा निवडणुका येत असतानाच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावेळी अमेरिकेत बसलेल्या राहुल गांधींनी आरक्षणाबाबत आपली योजना सांगितली आहे. काँग्रेस आरक्षण संपवू शकते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे, मात्र त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. ते म्हणजे निष्पक्षता म्हणजेच समानता. खरे तर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार तेव्हाच करेल जेव्हा भारतात आरक्षणाच्या बाबतीत निष्पक्षता असेल आणि आता तशी परिस्थिती नाही. प्रतिष्ठित जॉर्जटाऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी ही माहिती दिली.
वॉशिंग्टनमधील युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी राहुल यांना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारला होता आणि विचारले होते की ते किती काळ चालू राहील. त्यावर ते म्हणाले, ‘जेव्हा भारतात (आरक्षणाच्या बाबतीत) निष्पक्षता येईल, तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू. सध्या भारत हे योग्य ठिकाण नाही, असे राहुल गांधी म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही आर्थिक आकडेवारी पाहता, तेव्हा आदिवासींना 100 रुपयांपैकी 10 पैसे मिळतात. दलितांना १०० रुपयांपैकी पाच रुपये मिळतात आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) लोकांनाही जवळपास तेवढीच रक्कम मिळते. त्यांना योग्य सहभाग मिळत नाही हे सत्य आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले !(Rahul Gandhi on reservation )
राहुल गांधी म्हणाले, “देशातील ९० टक्के लोकसंख्या असलेल्या दलित, ओबीसी आणि आदिवासी समुदायांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालेले नाही, भारतातील मोठ्या संस्था, व्यवसाय, प्रसार माध्यमे यांचे नेतृत्व करण्याचा मुद्दा येतो, तेव्हा या समुदायांचा विचारही होत नाही. या सर्वांचा सहभाग तपासण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे. देशातील प्रमुख उद्योगांमध्ये, माध्यमांमध्ये आणि न्यायालयांत उच्च पदांवर मागासवर्गातील कोणीतरी
क्वचितच असतो. सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणात या वर्गाच्या स्थितीचा अंदाज येतो.मात्र,आपण भारतातील माध्यमे,आरोग्य क्षेत्र,शिक्षण यामधील उद्योगांच्या मालकीचा विचार करणे आवश्यक आहे. देशातील ९० टक्के लोकसंख्येकडे १० टक्क्यपिक्षा कमी पैसा आहे.” “सामाजिक स्थितीच्या बाबतीत भारत हे अनुकूल ठिकाण बनल्यावर आम्ही आरक्षण रद्द करण्याचा विचार करू. सध्या अशी परिस्थिती नाही,” असेही राहुल गांधी बोलले.
अंतरराष्ट्रीय मंचों पर राहुल गांधी ने हमेशा ही देशविरोधी बयान दिया है, जो किसी भी प्रकार से राष्ट्रहित में नहीं है।
हाल में ही आरक्षण ख़त्म करने को लेकर राहुल गांधी का बयान निंदनीय है। लोकसभा चुनाव के दौरान राहुल गांधी और कांग्रेस ने आरक्षण को लेकर झूठा नैरेटिव फैलाया लेकिन अब… pic.twitter.com/sVFqwbmml6
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 11, 2024
समान नागरी कायद्याबद्दल राहुल गांधी यांचे सूचक विधान
समान नागरी कायद्याबाबत विचारले असता राहुल गांधी म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडे काय आहे हे कळल्यानंतरच मी भाष्य करेन. ‘भाजप समान नागरी कायद्याचा प्रस्ताव मांडत आहे. आम्ही ते पाहिलं नाही. ते कशाबद्दल बोलत आहेत हे आम्हाला कळत नाही. त्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही. जेव्हा ते ते आणतील तेव्हा आम्ही ते पाहू आणि त्यावर भाष्य करू.
मायावती, ‘बसप’च्या प्रमुख यांचे राहुल गांधी वर पलटवार
काँग्रेसचा फार पूर्वीपासून प्रयत्न आहे. मागासवर्गातील लोकांनी राहुल यांच्या धोकादायक विधानांपासून सावध राहावे. जातीनिहाय जनगणनेच्या नावाखाली ते सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहात आहेत. अशा जनगणना करणे काँग्रेस पक्षाला भविष्यातही कधी शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांच्या नाटकांपासून सावध राहणे आवश्यक आहे.