नागपूर (Rahul Gandhi) : राहुल गांधी यांचे नागपुरात आगमन होताच, राजकीय वातावरण तापले आहे. (Rahul Gandhi) राहुल गांधींसोबत काम करणाऱ्या संघटना अत्यंत डाव्या आहेत. त्या अराजकता पसरवण्याचे काम करतात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींचा संबंध थेट नक्षलवाद्यांशी जोडला. याला उत्तर देत नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, संविधान वाचवण्याचे काम राहुल गांधी करत आहेत आणि संविधान वाचवणाऱ्याला भाजप नक्षलवादी म्हणून बघत आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आज बुधवार, ६ नोव्हेंबर रोजी नागपुरातील विधान सन्मान संमेलनाला उपस्थित आहेत. या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्याचा दावा खोटा असून भारतीय जनता पक्षाकडून पसरवल्या जात असलेल्या अफवांचा भाग आहे. संघाची शिकवण आणि त्यांना वारंवार खोटे बोलण्याची सवय लागल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड खोटे बोलले आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडल आणि यूट्यूबच्या माध्यमातून संविधान सन्मान संमेलनाचे ‘लाईव्ह फीड मीडिया’ला उपलब्ध असेल, त्यामुळे भाजपने पसरवलेल्या या अफवांवर मीडियाने विश्वास ठेवू नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते (Atul Londhe) अतुल लोंढे यांनी सांगितले.
या प्रकरणावर बोलताना अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी सांगितले की, संमेलन रेशीमबाग येथील कवी सुरेश भट सभागृहात होत असल्याने, भाजपने आपल्या असुरक्षिततेमुळे चुकीची माहिती पसरविण्याचा अवलंब केला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) हे नेहमीच माध्यमांपर्यंत पोहोचतात, पत्रकार परिषद घेतात, मुलाखती देतात आणि मीडिया स्वातंत्र्यासाठी बोलतात. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 11 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. नरेंद्र मोदी मीडियाला घाबरतात म्हणून? भाजपच्या राजवटीत, मीडिया स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताचा क्रमांक खूप खालचा आहे. माध्यमांना गोडी मीडिया असे लेबल का लावले जाते? सर्वोच्च न्यायालयाला टीव्हीवरील वादविवादांचे एकतर्फी स्वरूप का नमूद करावे लागले? या प्रश्नांची उत्तरे भाजपने देण्याची गरज आहे, असा टोला अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी लगावला.