देवानंद पवार यांचे प्रतिपादन
मानोरा (Rahul Gandhi Protest) : महायुतीचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांना खालच्या पातळीवर जाऊन अश्लाघ्य शिवीगाळ करीत आहे. नुकतेच संजय गायकवाड यांनी राहुलजी गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ कापणा-यास दहा लाख रुपयाचे बक्षीस देणार असल्याचे बेताल वक्तव्य केले. भारतीय जनता पार्टीने पोसलेल्या अशा वाचाळविरांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. लायकी नसलेल्या लोकांना पुढे करुन भाजपा रडीचा डाव खेळत आहे. अशा या भामट्यांना मतपेटीच्या माध्यमातून जनताच उत्तर देईल, असे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे सरचिटणीस, वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार (Devanand Pawar) यांनी केले. ते मानोरा येथील तालुका कॉंग्रेस कमिटीच्या आयोजित निषेध सभेत बोलत होते.
विरोधी पक्षनेता खा. राहुल गांधी वरील वक्तव्याबाबत निषेधाचा ठराव पारीत
लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीचे नेते व पदाधिकारी पिसाळले आहे. सपशेल अपयश आल्यामुळे महायुतीचे देवेंन्द्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार प्रचंड अस्वस्थ झाले असून त्यांच्या अधिनस्थ असलेल्या या भामटयांना महाविकास आघाडीवर भुंकायला सोडले आहे. आता हे चाटुगीरी करणारे पदाधिकारी कॉग्रेस नेते राहुलजी गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरदचंद्र पवार, शिवसेनेचे नेते उध्दवजी ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टिका करीत आहे. चोरसेनेचे संजय गायकवाड, संजय शिरसाट मनुवादी विचारसरणीचे गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा सभेत निषेध करण्यात आला. चोर युतीच्या नेत्यांकडून संस्काराची अपेक्षा करणे चुक आहे. राज्यात सर्व आघाडयांवर महायुतीचे सरकार अपयशी ठरले आहे. आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी लोकांना त्यांच्या मुळ प्रश्नांपासून विचलीत करण्यासाठी लायकी नसलेल्या लोकांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील नेत्यांवर पातळी सोडून टिका केली जात आहे. एकीकडे राज्यात शेतकरी आत्महत्तेत प्रचंड वाढ झाली आहे.
बेरोजगार तरुणांच्या हाताला कामे नसल्याने बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली आहे. महागाई तसेच महिला अत्याचाराने कळस गाठला आहे, आणि दुसरीकडे महिलांचा संसार उदध्वस्त करणारे हे भामटे दिड हजार देऊन लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही देवानंद पवार (Devanand Pawar) यांनी केला. या सभेला तालुका अध्यक्ष अमोल तरोडकर, शहर अध्यक्ष हाफीज खान, उपाध्यक्ष पटेल, जिल्हा उपाध्यक्ष गजानन राठोड, जिल्हा सरचिटणीस रामनाथ राठोड, सरचिटणीस रमेश येलधरे, मानोरा तालुका अनु. जाती काँग्रेस सेलचे अध्यक्ष वसंता भगत, जिल्हा सचिव पंडीत राठोड, जिल्हा सचिव डॉ सुर्यवंशी, ओबीसी जिल्हा अध्यक्ष डॉ. अशोक खरसडे, सेवादल अध्यक्ष बाबाराव ढंगारे, युवक कॉंग्रेस अध्यक्ष महेश जाधव, शहर उपाध्यक्ष हनीफ ठेकेदार, गोपाल पाटील चिस्तळकर, कारंजा शहर अध्यक्ष अमीर खान पठान यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉग्रेस शेतक-यांच्या पाठीशी
राज्यात शेतक-यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. आसमानी सोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सुलतानी संकट शेतक-यांचा जीव घेत आहे. कॉंग्रेसने काढलेल्या समस्या शोधदिंडीच्या माध्यमातून सरकारची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली. कारंजा मानोरा भागामध्ये प्रचंड मागासलेपणा असल्याचे समोर आले. शेतक-यांच्या शेतमालाला भाव नाही, शेतात जायला पांदन रस्ते नाही, सिंचनाची सुविधा नाही, विजेची सोय नाही, गरीबांना हक्काची घरे नाही, बेरोजगारांच्या हाताला काम नाही, शिक्षण व आरोग्याच्या सुविधा नाही, या सर्व प्रश्नांचा जाब सरकारला द्यावा लागेल. शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांच्या न्यायीक हक्कासाठी कॉग्रेस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे.