Shivamogga (rahul gandhi) : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi congress) यांनी प्रज्वल रेवन्नाच्या ‘अश्लील व्हिडिओ’ प्रकरणी मोदी सरकारवर (PM Modi) निशाणा साधला. प्रांजल रेवण्णाने कर्नाटकात काय केले, हा मोठा मुद्दा असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेत्याने दावा केला की, 400 महिलांवर पंतप्रधान मोदींचा पाठिंबा असलेल्या व्यक्तीने ‘सामूहिक बलात्कार’ केला होता.
काँग्रेस आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोप
लोकसभा निवडणुकी (LokSabha Elections) दरम्यान, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना यांचा कथित अश्लील व्हिडिओ काँग्रेस आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान सार्वजनिक झाल्यानंतर प्रकरण तापले आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी महिलांची माफी मागावी.
चारशे महिलांवर बलात्कार
कर्नाटकातील शिवमोग्गा येथे जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी (Rahul Gandhi news) यांनी प्रज्वल यांनी रेवण्णा यांच्यावर मोठे आरोप केले. रेवण्णाने चारशे महिलांवर बलात्कार केला असून, त्यांचे व्हिडिओही बनवले आहेत, असे त्यांनी सांगितले. (PM Modi) मोदी सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामूहिक बलात्कार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाच्या प्रचारासाठी माफी मागितली पाहिजे.
सेक्स स्कँडल नसून सामूहिक बलात्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) निशाणा साधत राहुल गांधी (Rahul Gandhi news) म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील माता-भगिनींची माफी मागावी. प्रज्वल रेवण्णाने चारशे महिलांवर बलात्कार करून त्यांचा व्हिडिओ बनवला. हा सेक्स स्कँडल नसून सामूहिक बलात्कार आहे. वास्तविक, प्रज्वल रेवन्ना प्रकरणाशी संबंधित आरोप आणि व्हिडिओंची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने कठोर पावले उचलली आहेत. व्हिडिओ आणि आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.