अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात शिवीगाळ
मुंबई (Rahul Gandhi) : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत हिंदू विरोधी वक्तव्य केल्याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. भाजपचे प्रसाद लाड यांनी हा विषय काढून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुमोटो राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव करावा अशी मागणी केली होती. त्यावेळी (Maharashtra Legislative Council) महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासात आज मराठी संस्कृतीला अत्यंत लाज वाटणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. सुरवातीला विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी तितक्याच हलक्या भाषेत शिवी देऊन प्रत्युत्तर दिले. दोघांमध्ये त्यावेळी हातापाई होण्याचा प्रसंग निर्माण आला होता.
भाजपचे प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी हा विषय काढून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुमोटो राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निषेधाचा ठराव करावा अशी मागणी केली होती. त्यावेळी हा लाजिरवाणा प्रसंग घडला. विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षात झालेल्या शाब्दिक चकमकीत अत्यंत गलिच्छ व महिलांचा अपमान करणाऱ्या शिव्यांचा उपयोग केला गेला.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी लोकसभा सभागृहात, आमच्या सर्व महापुरुषांनी अहिंसा आणि भीती दूर करण्याची भाषा केली आहे. पण, जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते फक्त हिंसा, द्वेष, असत्य यावर बोलतात, तुम्ही हिंदू नाही. असे वक्तव्य केले होते. असे वक्तव्य झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हस्तक्षेप केला. (Rahul Gandhi) राहुल गांधींच्या वक्तव्याने संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान केला असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्य विरोधात पुढाकार घेतल्यामुळे विधान परिषदेत निषेधाचा ठराव करण्याची मागणी सत्ताधारी भाजपने केली. यावेळी भाजपच्या प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय व अन्य सदस्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यावेळी काँग्रेसच्या आमदार ऐवजी उबाठाचे अंबादास दानवे जास्तच चिडल्याचे दिसून आले. प्रसाद लाड (Prasad Lad) हे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्याकडे पाहून व हातवारे करून, तुम्ही निषेध करा असे आवाहन करीत होते. त्याचा दानवे यांना राग आला व त्यानंतर राज्याची मान खाली जाईल अशा शिव्या विरोधी पक्ष नेते दानवे आणि लाड यांच्या तोंडून महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहाला ऐकावयास मिळाल्या. (Maharashtra Legislative Council) विधान परिषदेच्या इतिहासात आजचा दिवस विसरणाऱ्या दिवसाच्या यादीत समावेश व्हावा, असा आजचा प्रसंग होता.