इंडिया आघाडी सरकार आल्यास देशात क्रांतिकारी निर्णय घेणार : राहुल गांधी
शेतकरी कर्जमाफीसाठी किसान आयोग, गरीब महिला-बेरोजगार युवकांसाठी लखपती योजना
संविधान हे गरिबांचे हत्यार ते बदलविण्याची शक्ती कुणाकडेही नाही
परतवाडा (Amravati) : दहा वर्षात नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने देशातील दहा ते पंचवीस लोकांचाच विचार केला मात्र आम्ही देशातील सर्वच घटकाला न्याय देऊन त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणार आहोत, (India Aghadi) इंडिया आघाडी सरकारमध्ये गोरगरीब महिलांकरिता महालक्ष्मी योजना,श्रीमंतांच्या मुलांप्रमाणेच बेरोजगार युवकांसाठी अप्रेंटिशिप चा अधिकार तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरीता किसान आयोग आणणार असल्याची घोषणा राहुल गांधींनी करताच विराट सभेत टाळ्यांचा कटकडात झाला. परतवाडा येथील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचासभेत बोलतांना सांगितले की इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर देशाचा चेहरामोहरा बदलविणार असून संविधान विरोधी मोदी सरकार संविधान संपविण्याचा मार्गावर आहे. देशाची आण व गरिबांचे हत्यार म्हणून ओळखले जाणारे संविधान कोणतीच शक्ती बदलवू शकणार नाही असा इशारा (Rahul Gandhi) राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला.
परतवाडा येथील भारत जोडो मैदानावर काँग्रेस चे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जंगी सभा झाली. या सभेला विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, माजी पालकमंत्री आ. यशोमती ठाकूर, माजी खासदार अनंत गुढे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, देशोन्नती संपादक प्रकाश पोहरे, पदवीधर मतदार संघांचे आमदार धीरज लिंगाडे,काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख, काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष वसाहत मिर्झा , काँग्रेस प्रवक्ते दिलीप ऐडतकर, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष संगीता ठाकरे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष सुनील खराटे, अकोला लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार डॉ अभय पाटील,शिवसेना नेत्या प्रीतीताई बंड,वासंतीताई मंगरोळे, मन्ना दारसिबे, अब्राहर सर,दयाराम काळे, शिवसेना युवा जिल्हा अध्यक्ष पराग गुळढे,खोब्रागडे, माजी आ. धाने पाटील, आदिवासी नेते राज चव्हाण,मुझफर हुसेन, यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारचा (Narendra Modi) आपल्या भाषणातून चांगलाच समाचार घेतला. मोदी सरकार हे गरिबी व संविधान विरोधी सरकार असून त्यांनी केलेले काम हे फक्त श्रीमंत आणि विशिष्ट वर्गासाठी केले असल्याचे दिसून येते. नोटबंदी, जीएसटी, कृषी कायदा हे विशिष्ट लोकांसाठी घेतलेले निर्णय सर्वश्रुत आहे. उद्योगपतींना कर्जमाफी देऊन मोदींनी शेतकरी व गरिबांचे हक्क हिरावले आहेत. त्यांनी विशिष्ट लोकांना श्रीमंत केले असले तरी इंडिया आघाडी चे सरकार बनताच आम्ही करोडो गरिबांना लखपती बनविणार असल्याचे (Rahul Gandhi) राहुल गांधीनी सांगितले. याकरिता महालक्ष्मी व अप्रेंटिशिप सारख्या योजनांमधून गरीब कुटुंबातील महिलेला व बेरोजगार युवकाला वर्षाकाठी १ लाख रुपये देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी विविध विषयांवर भाष्य करतांना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देशातील मीडिया देखील गोदी मीडिया झाल्याचे सांगून कोणत्याही चॅनेलवर गरिबांच्या व शेतकऱ्यांच्या समस्या याबाबत चर्चा होतांना दिसत नाही कारण मीडियाच्या ३०० मालकांच्या व अँकरच्या यादीत एकही दलित, आदिवासी किंवा मागासवर्गीय नाही त्यामुळे तुमच्या कोणत्याही समस्या चॅनेल वर चर्चिल्या जात नसल्याचा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला.
देश चालविणाऱ्या महत्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये व उद्योग कंपन्यांच्या मॅनेजमेंट मध्ये सुद्धा हीच मागास व गरीब वर्गातील घटकांची संख्या नसल्यालगत आहे त्यामुळे कोणताच निर्णय आपल्या बाजूने येत नाही परंतु आपल्याकडे संविधानासारखे हत्यार आहे आणि ते हत्यार संपविण्याचा घाट मोदी सरकार करत आहे परंतु कोणतीही शक्ती संविधान संपवविण्याचे धाडस करू शकणार नाही. येत्या काही दिवसात इंडिया आघाडीचे सरकार बनणार असून दूध का दूध आणि पाणीचे पाणी होईल. एक वर्षातच जातीनिहाय जनगणना करणार असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले.सभेत उपस्थितअसणाऱ्या नागरिकांनीही राहुल गांधी यांच्या भाषणाला प्रचंड प्रतिसाद दिला. प्रारंभी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे मोठा पुष्पहार घालून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. राहुल गांधी व्यसपीठावर येताच उपस्थितांनी प्रचंड घोषणा दिल्या. (Rahul Gandhi) राहुल गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, वा रे पंजा, आला रे पंजा, राहुल गांधी जिंदाबाद, खावो मिठाई बाटो पेढे, घर घर बळवंत वानखडे अश्या घोषणांनी सभास्थळी नवचैतन्य निर्माण झाले होते. राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी लाखोंचा जनसागर उलटला होता.सभेला इंडिया आघाडीचे सर्वच घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी प्रकाश पोहरे, आ. वजाहत मिर्झा, खा. चंद्रकांत हंडोरे, सुधीर सुर्यवंशी, बबलू देशमुख यांनी सभास्थळी आपले मनोगत वव्यक्त केले.
देशाचा चेहरा बदलवणार
नफरत के बाजार मे मोहब्बत की दुकान लावायची आहे असे सांगून राहुल गांधी यांनी देशाचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी इंडिया आघाडी चे सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांसह महिला, बेरोजगार व गरिबांसाठी विविध योजना राबविणार असल्याचे अभिवचन दिले. आशा व अंगणवाडी सेविकांचे वेतन दुप्पट करणार असल्याचे सांगून नोकरीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण, गरिबांना महिलांना ८५०० वेतन तसेच बेरोजगार युवकांना ८५०० रुपये वेतन तसेच शेतकऱ्यांचे शक्य तेवढ्या वेळेस कर्जमाफी करणारा किसान आयोग बनवणार असल्याचे त्यांनी नमूद केले. देशात खूप पैसा आहे इंडिया आघाडी चे सरकार क्रांतिकारी निर्णय घेऊन देशाचा चेहरा मोहरा बदलेल फक्त जनतेने आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन करून कोणत्या विचार सरणीचे सरकार देशाचे भले करू शकते. याचाही विचार जनतेने करावा याकरिता बळवंत वानखडे सारख्या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले.