मानोरा (Manora Police Station) : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विठोली येथे ७४ नग ९० एम एल चे देशी टांगो पंच कंपनीचे बॉटल २५९० दारु पोलीसांनी गुप्त माहिती वरुन दि. २२ ऑक्टोंबर पकडून आरोपी रवि बापूराव नाटकर वय ४३ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सुत्राकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून दि. २२ ऑक्टोंबर रोजी एकुण ७४ नग ९० एम एलचे देशी दारु टंगो पंच कंपनीचे बॉटल किंमत २५९० रुपयाचे आरोपी रवि नाटकर यांच्याकडून पोलीसांनी रंगेहात पकडले. सदर कारवाई (Manora Police Station) पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल मदन पुणेवार, सहाय्यक फौजदार रविंद्र राजगुरे, पोलीस कर्मचारी मनीष अगलदरे, रोहण तायडे, महीला पोलीस सुषमा लोखंडे, शंखर राख यांनी अपराध क्रमांक ७१९ २०२४ कलम ६५ ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करून कारवाई केली.