चिमूर (Chimur) :- तालुक्यातील खुटाळा येथे शंकरपटाच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगारावर चिमूर पोलिसांनी वेशांतर करून धाड टाकून आरोपीवसह एैवज जप्त केल्याची कारवाई पोलिसांनी दि. ११ मे रोजी केली. या जुगारावर चिमुर पोलीस स्टेशनचे (Police station) सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी सापळा रचुन दि. ११ मे २०२५ ला आपल्या पथकासहित शंकरपटात गेले असता त्याठिकाणी जुगार, झंडीमुंडी सुरू होती.
शंकरपटाच्या नावाखाली चालु असलेला जुगार थांबेल काय ?
यावेळी निशांत फुलेकर यांनी लगेच पिच्चर स्टाईलने झंडीमुंडीच्या पडदीसह २ हजार ८१० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. धनराज गेडाम रा. नेरी यांना २ हजार ६६० नगद रोकड व इतर साहित्य असा एकूण २ हजार ८१० रुपयाच्या मुद्देमालासहीत जुगार तस्करांना ताब्यात घेत महाप्रसाद दिला व जुगार कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई (action) केली. त्यामुळे आता जुगार तस्करांचे धाबे दणाणले असुन आता खुटाळा येथे शंकरपटाच्या नावाखाली चालु असलेला जुगार थांबेल काय ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सदरची कारवाई चिमूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर यांच्या उपस्थितीत विलास निमगडे, सचिन साठे, सचिन खामनकर यांच्या पथकांनी केली. अशी माहिती चिमूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी दिली.




