कारंजा (Washim):- मागील काही दिवसांपासून कारंजा शहरात अवैद्य जुगार अड्डा चालविल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात तीन टीम तयार करून 10 मे रोजी शहरात 3 ठिकाणी ग्रामीण पोलीसानी जुगार अड्ड्यावर छापे मारले.
2 लाख 81 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त
यावेळी 2 लाख 81 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर एकूण 20 आरोपी विरुद्ध जुगार ॲक्ट नुसार कारवाई करण्यात आली. पोलीस निरिक्षक प्रविण खंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज पवार, दिपक ढोबळे, सचिन इंगोले व अंकुश सोन्नर यानी शहर पो.स्टे हद्दीतील झांशी राणी चौक येथे श्रीजल वाईन बारच्या पाठीमागे छापा मारून जुगार खेळणाऱ्या दुर्गेश गजाननराव सुरजुसे, विजय पांडुरंग मेश्राम, सलिम लचमन निन्सुरवाले, नंदु रमेश चव्हाण, सुनिल अण्णा उपाध्ये यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन नगदी 7650 रुपये 35 हजार रुपये किमतीचे 3 मोबाईल व 1 लाख 30 हजार रुपये किमतीच्या 2 दुचाक्या असा एकुन 1 लाख 72 हजार 650 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
बाबासाहेब आंबेडकर चौक येथील हॉटेल विसावा चे पाठीमागे रेड
तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड, छोटेबली पप्पुवाले, मनोज गोफने व विनोद राठोड यांनी कारंजा शहर पो .स्टे हद्दीतील बाबासाहेब आंबेडकर चौक (Babasaheb Ambedkar Chowk)येथील हॉटेल विसावा चे पाठीमागे रेड करुन गजानन पांडुरंग गायकवाड, राजेश शंकरराव लाड, ललित पद्मशी खोना व दिनकर हिम्मतराव लाड यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन नगदी 56,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.तर पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील चव्हाण, विनोद महाकाळ, युसुफ भुरीवाले व चेतन गावंडे यांनी पो.सटे. कारंजा शहर हद्दीत मारवाडी पुरा येथील अग्रवाल यांचा वाडा येथे जुगार रेड (Raid) केली असता पवन श्रीराम राय, महेश लीलाधर अहेरराव, संजय रतनलाल धुवार्य, प्रशांत नंदकिशोर पातुरकर, मोहन गणपत गोघलीया, आकाराम पुडलिक वंजारी, अब्दुल रफीक अब्दुल शहीद, प्रकाश लक्ष्मणराव मुमाने, रहीम अन्नु कामनावाले, संदीप शंकरराव रावेकर, सुनिल रघुनाथ गायकवाड ताब्यात घेवुन त्यांचेकडुन नगदी 42 हजार 120 रुपये व 10 हजार 500 रुपये किमतीचे 7 मोबाईल असा एकुन 52 हजार 620 रु. चा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईमुळे अवैध धंद्यांवर अंकुश
पोलीस अधिक्षक अनुज तारे यांचे आदेशाने अपर पोलीस अधिक्षक भारत तांगडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अराज यांचे मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या ठिकाणी अवैधपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापे टाकुन एकुन नगदी रुपये 1 लाख 5 हजार 870 रुपये, 10 मोबाईल किमत 45 हजार 500 रुपये व 2 दुचाकी किमत 1 लाख 30 हजार रुपये असा एकुन 2 लाख 81हजार 370 रुप्याचा मुद्देमाल जप्त करुन 20 आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 अंतर्गत पो.स्टे. कारंजा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे (Illegal business) करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून या कारवाईमुळे अवैध धंद्यांवर अंकुश लागेल.