दिल्ली-NCR :- अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली-एनसीआर, मुंबई (Mumbai) आणि नागपूरमधील (Nagpur) 35 परिसरांवर छापे टाकले. 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बँक (Bank) कर्ज फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांवर मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हा छापा टाकण्यात आला.
युनिटच्या विरोधात सीबीआयच्या तपासातून या तपासाला सुरुवात
अमटेक ग्रुप आणि त्यांच्या संचालकांवर ईडीचा हा छापा टाकण्यात आला असून त्यात अरविंद धाम, गौतम मल्होत्रा आणि इतरांची नावे आहेत. दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई आणि नागपूर येथील सुमारे 35 व्यावसायिक आणि निवासी परिसरांवर छापे टाकण्यात आले आहेत. आमटेक ग्रुपच्या एसीआयएल लिमिटेड या युनिटच्या विरोधात सीबीआयच्या तपासातून या तपासाला सुरुवात झाली.
ईडीच्या म्हणण्यानुसार, यामुळे सरकारी तिजोरीचे अंदाजे 10,000 ते 15,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अधिक कर्ज मिळविण्यासाठी, समूहाने बनावट विक्री, भांडवली मालमत्ता, कर्जदार आणि नफा दाखवला जेणेकरून ती अनुत्पादित मालमत्ता म्हणून टॅग होऊ नये, असे सूत्रांनी सांगितले. यासोबतच लिस्टेड शेअर्समध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप करण्यात आला. ईडीने सांगितले की शेल कंपन्यांच्या नावावर हजारो कोटी रुपयांची मालमत्ता तयार केली गेली आणि बेनामी संचालक आणि भागधारकांद्वारे नवीन नावाने पैसे जमा केले जात आहेत.