Hingoli:- हिंगोली येथे रेल्वे विभागाच्या (Railway Division) जागेवर रेल्वेचे कार्गो टर्मिनल (Railway cargo terminal) उभारले जाणार असून त्यासाठी सुमारे ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी(Farm) वर्गाची मोठी सोय होणार असून जिल्हयातून शेतीमाल वाहतुकीमुळे विकासाला चालना मिळणार आहे.
रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत या टर्मीनलच्या उभारणीचे काम हाती घेतले जाणार
केंद्राच्या रेल्वे मंत्रालयाने(Ministry of Railways) देशात १०० ठिकाणी गतीशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मीनल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन वर्षात या टर्मीनलची उभारणी केली जाणार आहे. देशातील महत्वाच्या रेल्वेस्थानकाजवळ या टर्मीनलची उभारणी केली जाणार असल्याने त्या त्या ठिकाणावरून कृषी, औद्योगिक वस्तूंची(industrial goods) वाहतुक करणे सोयीचे होणार आहे. यामध्ये हिंगोली येथील रेल्वेस्थानकाच समावेश आहे. त्यानुसार रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत या टर्मीनलच्या उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी सुमारे ७० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यातून कच्चा किंवा पक्का माल उतरविण्यासाठी प्लॅटफॉर्म(platform), नवीन रेल्वे लाईन अंथरली जाणार आहे. तसेच व्यापारी, उद्योजक, कामगार यांच्यासाठी विश्रांतीकक्ष, समेंट रोड, परिसरात १० हायमास्ट लाईटस्, सिमेंेट रस्त्यावर पथदिवे उभारले जाणार आहे. या शिवाय या भागात सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV cameras)बसविले जाणार असून परिसरावर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे.
बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या हळदीला भौगोलिक मानांकन देखील मिळाले
दमऱ्यान, हिंगोली जिल्ह्यात हळदीची मोठी बाजारपेठ असून आता हळद प्रक्रिया (Turmeric process) उद्योग देखील सुरु झाले आहेत. या शिवाय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या हळदीला भौगोलिक मानांकन देखील मिळाले आहे. त्यामुळे या भागातील हळद व प्रक्रिया केलेली हळद टर्मीनलमुळे इतर राज्यात पाठविणे शक्य होणार आहे. त्यातून हळदीची मागणी वाढणार आहे. याशिवाय हिंगोलीत सुरु असलेल्या सोयाबीन प्रक्रिया(Soybean processing) उद्योगातून तयार होणारे तेल, ढेप, कापूस प्रक्रिया उद्योगातील कापूस गाठी इतर राज्यात पाठविणे शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्हयाच्या कृषी व औद्योगिक विकासाला चालणा मिळणार अाहे.