परभणी (Parbhani):- काझीपेठ – दादर ही एक्सप्रेस पिंगळी येथे आली असता सिग्नलमध्ये बिघाड करत रेल्वे थांबवुन प्रवाशांजवळील साहित्य लुटण्यात आले. ही घटना रविवार १३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १.३० च्या सुमारास घडली. चार प्रवाशांचे साहित्य चोरीला गेले. या प्रकरणी मनमाड येथे गुन्हा नोंद झाला आहे. घटनास्थळी आरपीएफ, लोहमार्ग, स्थानिक पोलिसांनी भेट दिली.
सिग्नलमध्ये बिघाड करत प्रवाशांजवळील साहित्य लुटण्याची घटना
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, काझीपेठ- दादर रेल्वे आपल्या नियमीत वेळेनूसार धावत होती. रात्रीची वेळ असल्याने प्रवाशी गाढ झोपेमध्ये होते. पिंगळीजवळ रेल्वे आली असता सिग्नलमध्ये बिघाड करून रेल्वे (Railway)थांबवण्यात आली. त्यानंतर चोरट्यांनी प्रवाशांजवळील मोल्यवान साहित्य लंपास केले. चोरीची माहिती पोलीसांना देण्यात आली. रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस, स्थानिक पोलीसांनी धाव घेतली. प्रवाशांची विचारपुस केल्यानंतर रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या प्रकरणी मनमाड येथे झिरोने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील परभणी जिल्ह्यात सिग्नलमध्ये बिघाड करत प्रवाशांजवळील साहित्य लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. गंगाखेड- परळी तसेच गंगाखेड – परभणी या मार्गावर रेल्वेतील प्रवाशांना लुटण्यांच्या घटनांची मागील महिन्याभरात नोंद झाली आहे.