नांदेड येथून अमृतसर कडे धावणारी दैनंदिन सचखंड सुपरफास्ट एक्स्प्रेस आज रद्द
परभणी/पूर्णा (Parbhani):- उत्तरेतील राज्यात जोमाने सुरु असलेल्या किसान आंदोलनामुळे(Peasant movement) उत्तर भारतातुन ईतरत्र धावणा-या गाड्या रद्द करण्याची नामुष्की भारतीय रेल्वे प्रशासनावर ओढावली आहे. नांदेड येथून अमृतसर कडे धावणारी दैनंदिन (सचखंड सुपरफास्ट एक्स्प्रेस)पुन्हा एकदा दि .१० मे रोजी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली आहे.
केंद्र शासनाच्या (Central Govt) धोरणाविरोधात उत्तरेकडील बहुतांश राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील दोन ते तीन महीन्यांपासून रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे रास्तारोको, बंद ,चक्काजाम रेलरोको सारखे जोरदार आंदोलन सुरू केले आहे. याचा फटका सार्वजनिक वाहतूकीस मोठ्या प्रमाणात बसत आहेत उत्तर भारतातुन देशातील ईतर राज्यात जाणारी रेल्वेसेवाही मागील काही दिवसांपासून कोलमडली आहे. अनेक रेल्वे १० ते १२ तास उशिराने धावत आहेत तर आंदोलनामुळे अनेक रेल्वे (railway) गाड्या प्रशासनाला रद्द कराव्या लागत आहेत.
नांदेड विभागातील हुजुर साहेब नांदेड स्थानकावरुन उत्तर भारतातील अमृतसर करीता दैनंदिन धावणा-या सचंखंड एक्स्प्रेसलाही या आंदोलनाचा फटका बसला असून, मागील महीन्याभरापासुन या गाडीचे वेळापत्रक कोलमडले आहे तर दोन वेळा ही गाडी प्रशासनाला रद्द ही करावी लागली आहे.पुन्हा एकदा याच कारणामुळे शुक्रवार दि. 10 मे रोजी नांदेड येथून सुटणारी 12715 नांदेड ते अमृतसर (सचखंड एक्स्प्रेस) पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. प्रशासनाने अमृतसर येथून नांदेड कडे येणारी 12716 सचखंड एक्स्प्रेस 800 मिनिटे उशिरा धावत असल्याचे सांगितले आहे.
पंजाब राज्यातील शिख समुदायाची भावीक मंडळी नांदेड येथील श्री.हुजुर साहेब गुरुद्वारा येथे मोठ्या प्रमाणावर येत असतो. उत्तरभारतातील सुरू असलेल्या किसान आंदोलनामुळे उत्तरेकडून नांदेड कडे धावणारी रेल्वे वाहतूक कोलमडली आहे.कधी गाड्या दोन दिवस उशिरा धावत आहेत तर कधी रद्द होत असल्याने भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.