हिंगोली (Railway Strike) : पुर्णा-अकोला रेल्वे मार्गावरील अनेक प्रलंबित मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या प्रश्नी आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या (Railway Strike) प्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते गोवर्धन अण्णा विरकुँवर यांच्या नेतृत्वाखाली शेख खलील बेलदार , हरिष नैनवाणी, शाम खंडेलवाल, बाबा घुगे यांनी नांदेड विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकास दिलेल्या निवेदनात नमुद केले की, अकोला-पुर्णा रेल्वे मार्गाचे सन २००८ मध्ये मिटरगेजचे ब्राडगेजमध्ये रुपांतर झाले. काचीगुडा -अजमेर ही रेल्वे नियमित हैद्राबादला रात्रीकालीन चालत होती. तसेच काचीगुडा -जयपुर ही रेल्वे ही रात्रीकालीन चालत होती. पुर्णा-खंडवा ही रेल्वे सुध्दा नियमित धावत होती.परंतु या रेल्वे पुन्हा चालु झाल्या नाहीत.
मुंबई-पुणे जाण्याकरीता नियमित रेल्वे आहे. परंतु अकोला-पुर्णा सेक्शनची एक ही रेल्वे उपलब्ध नाही. यासाठी अनेक वेळा निवेदन देवुन सुध्दा या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या (Railway Strike) मागण्याच्या तात्काळ विचार करावा अन्यथा ३ मार्च पासुन हिंगोली रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण केले जाईल असा इशारा गोवर्धन विरकुँवर यांनी दिला आहे.