Hajj 2024 Saudi Arabia:- सौदी अरेबियातील कडक उष्णतेमध्ये यावर्षी हज यात्रेदरम्यान शेकडो लोकांचा मृत्यू (Death)झाला. अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की लोक त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह(Dead Body) बाहेर काढण्याची वाट पाहत होते.
Despite the ban & censorship by the Saudi authorities, thousands of Iranians chanted slogans of "Death to israel" & "Death to America" and raised Palestinian flags in all sacred places, including the Holy Kaaba.#hajj_2024 #GazaGenocide #IsraelIsATerroristState #EidAlAdha pic.twitter.com/vfcPzrWm9P
— Sajid Abbas (@SajidAb91913290) June 16, 2024
90 भारतीयांसह 900 हून अधिक लोकांचा मृत्यू
प्रत्येक मुस्लिमाला आयुष्यात एकदा हज यात्रेला जावेसे वाटते. हज 2024 दरम्यान, जगभरातील मुस्लिम(Muslim), सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना येथे पोहोचले. पण उष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे(Heat waves) येथे 90 भारतीयांसह 900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अशा स्थितीत सौदी सरकारची जगभरात नामुष्की ओढावली आहे. कारण उष्णतेचा सामना करण्यासाठी सरकारने आवश्यक ती व्यवस्था केलेली नाही. अद्याप यावर सौदी सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. तसेच मृतांच्या संख्येबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, शेकडो मुस्लिम कुटुंबे अजूनही त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह त्यांच्या मायदेशी नेण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
अति उष्मा आणि उष्माघात प्राणघातक ठरतात
विदेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाच दिवसांच्या हज यात्रेदरम्यान किमान 900 लोकांचा मृत्यू झाला. आकडेवारीनुसार, यावेळी जगभरातून 18 लाखांहून अधिक मुस्लिमांनी हज यात्रेत भाग घेतला. या काळात प्रचंड उकाडा जाणवत होता. मक्कामध्ये सोमवारी कमाल तापमान 51.8 अंशांवर पोहोचले. न्यूज एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार, एकट्या इजिप्तमध्ये किमान 600 लोकांचा मृत्यू झाला आहे. विविध देशांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ९९२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
या देशांतील हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला
सौदी राजनयिकांच्या म्हणण्यानुसार, पाच दिवसांच्या हज यात्रेदरम्यान 80 भारतीयांचाही मृत्यू झाला. मारले गेलेले सर्व यात्रेकरू नैसर्गिक कारणाने मरण पावले. इजिप्त व्यतिरिक्त जॉर्डन, इंडोनेशिया, इराण, ट्युनिशिया, इराक आणि सेनेगल यांनी त्यांच्या नागरिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांनी कारण दिलेले नाही. ठार झालेल्या यात्रेकरूंचे कुटुंबीय सोशल मीडियावर त्यांच्या नातेवाईकांबद्दल पोस्ट करत आहेत. जेणेकरून त्यांना त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकेल.