मानोरा (Irrigation projects) : तालुक्यामध्ये युती शासनाच्या काळात १४ सिंचन तलावाची (Irrigation pond) निर्मिती झाली होती. त्यातील काही सिंचन तलावाच्या भिंती व साडव्याला भेगा व छिद्रे पडल्यामुळे प्रकल्पामधील पाणी वाहुन जात आहे. त्यामुळे ओलीताच्या क्षेत्रात घट होत आहे. तसेच तलावाच्या भींतीवर मोठया प्रमाणात झाड़े झुडपे वाढली आहे. तेंव्हा प्रशासनाने दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या (Irrigation projects) प्रकल्प सिंचनाची दुरुस्ती करुन भिंतीवरील झाडे तोड़ावी, अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.
14 सिंचन प्रकल्प दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
तत्कालीन राज्यशासन मधील भाजप शिवसेना युती शासनाच्या काळात आ. स्व . गजाधर राठोड यांनी आपल्या कार्यकाळात मानोरा तालुक्यात १४ सिंचन प्रकल्प (Irrigation projects) शासनाकडून मंजूर करून आणले होते. त्यामध्ये चिखली व वाईगौळ हे दोन प्रकल्प गेल्या १० ते १५ वर्षापासुन सिंचन कालव्याच्या भिंती व सांडव्यामध्ये भेगा व छीद्र पडल्यामुळे यामधुन पाणी लीकेज होत आहे. तसा दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मुदु जलसंधारण विभागाने शासनाकडे २०२२ मध्ये असल्याचे समजते. सतत साठवणूक झालेले पाणी लीकेज होत असल्यामुळे प्रकल्पात पाणी राहत नाही. त्यामुळे ओलीताचे प्रमाण घटले आहे.
यावर्षी तालुक्यात मोठया प्रमाणात पाऊस (heavy rain) पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे . येणाऱ्या काळात तलाव क्षेत्रात ढगफुटी वा (heavy rain) अतिवृष्टी झाली कालवा तर फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तालुक्यातील चिखली , वाईगौळ, आमदरी, रुई, आसोला( गव्हा), गारटेक, चौसाळा, कार्ली, धानोरा भुसे, बोरव्हा, पंचाळा, वाटोद आदी धरणावरील भिंतीवर मोठया प्रमाणात झाड़े वाढली आहे. कालव्याचे पाट ही जागो जागी फुटले झुडपे वाढली आहे. त्यामुळे शेवटच्या लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत शेतात शेती ओलितासाठी पाणी पोहचत नाही. तसेच भिंती व सांडण्याची दुरुस्ती व भिंतीवरील वाढलेल्या झाडा झुडपाच्या काढणीसाठी व प्रस्ताव (Water conservation) मुदु जल संधारण विभागाने २०२२ मध्ये अंदाजपत्रकासह शासनाकडे पाठवले आहे. तेंव्हा शासनाने याकडे लक्ष घालुन दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दयावा, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.