औंढा नागनाथ/हिंगोली (Raj Thackeray) : श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील आठवे (Jyotirlinga Shri Nagnath) ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे दिनांक आठ ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दर्शन घेतले यावेळी येथील मंदिरावरील कलाकसुरीची त्यांनी पाहणी केली यादरम्यान मंदिर संस्थान कडून त्यांचा नागनाथाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंदिराचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ गार्ड प्रमुख बबन सोनवणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष बंडूभाऊ कुटे,तालुका अध्यक्ष दीपक सांगळे,शहर प्रमुख दीपक जगताप, वैभव बल्लाळ, आदींची उपस्थिती होती या दरम्यान पोलीस निरीक्षक जीएस राहिरे उपनिरीक्षक किशोर पोटे जमादार गजानन गिरी संदीप टाक सुभाष जयताडे यांनी बंदोबस्त ठेवला होता.